शहाद्यात सहा गावठी पिस्तोलसह काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:01 PM2018-05-19T13:01:11+5:302018-05-19T13:01:11+5:30
शहाद्यात कारवाई : नंदुरबारातही भोणे फाटय़ावर तलवार जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील शिरुड चौफीलीवर 19 वर्ष वयाच्या युवकाकडून सहा गावठी पिस्तोल व आठ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी उशीरा एलसीबीने ही कारवाई केली. दरम्यान, नंदुरबारात एकाला तलवारीसह ताब्यात घेण्यात आले.
मोनिश मुन्ना शेख (19) रा.मोतीबाग गल्ली, सेंधवा व 17 वर्षीय अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील एकजण शहाद्यात गावठी पिस्तोल विक्रीसाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने शहाद्यातील शिरुड चौफुली भागात सापळा रचला. सायंकाळी उशीरा मोनिश शेख हा त्या भागात मोटरसायकलीवर संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सहा गावठी पिस्तोल जप्त करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी 35 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी पिस्तोल मॅगङिानसह, प्रत्येकी 25 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी पिस्तोल मॅगङिानसह, 1800 रुपये किंमतीचे आठ जिवंत काडतूस, 40 हजारांची मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले.
याबाबत पोलीस नाईक भटू धनगर यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, रवींद्र लोंढे, अनिल गोसावी, पंढरीनाथ ढवळे, दिपक गोरे, रवी पाडवी, योगेश सोनवणे, विकास पाटील, विनोद जाधव, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, गोपाल चौधरी, संदीप लांडगे, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, महेंद्र सोनवणे, पाटील, मोरे, ढमढेरे, पावरा, पवार, राजपूत, महाले यांनी केली.