शहाद्यातील एटीएम फोडणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:59 PM2018-05-30T12:59:31+5:302018-05-30T12:59:31+5:30

पोलीस कोठडी : मध्य प्रदेशातील निमज येथून घेतले ताब्यात, सहा संशयीत अद्यापही फरारच

Shahadan ATM breaker | शहाद्यातील एटीएम फोडणारा गजाआड

शहाद्यातील एटीएम फोडणारा गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : लोणखेडा रस्त्यालगत सिध्दी विनायक मंदिरासमोरील युनियन बँकेचे एटीएम मशिन फोडून त्यातुन 3 लाख 12 हजार रुपये चोरीप्रकरणी ताहीर उर्फ राजू गफूरखान, रा. गुराका जि. पलवल (हरियाणा) यास निमज (म.प्र )           येथून शहादा पोलिसांनी  अटक            केली. त्यास न्यायालयात हजर            केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेतील  आरोपीचे अन्य सहा साथीदार फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी लवकरच पुन्हा पथक पाठविण्यात येणार आहे. 
लोणखेडा चाररस्ता लगत वर्दळीच्या ठिकाणी सिध्दी विनायक मंदिरासमोर युनियन बँकेचे एटीएम आहे. 23 मार्च  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साधारण एक ते चार वाजेदरम्यान अज्ञात चोरटय़ांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएमचा              दरवाजा कापून त्यातून तीन लाख             12 हजार रुपये चोरुन नेल्याची             घटना घडली होती. सकाळी  सव्वाआठ वाजेचा सुमारास युनियन बँकेचे एटीएम  फोडल्याची सुचना भ्रमणध्वनीद्वारे बँक व्यवस्थापक श्रीधर राऊत याना मिळाली.                त्यांनी त्वरीत उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी.पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक बडगुजर, एस.बी.शिंदे पोलीस कर्मचारी मनोज सरदार, जलाल शेख, भटु धनगर, स्वप्निल गोसावी, विकास कापूरे, देवा गावीत, मनोज महाजन घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे  एटीएम लगत हॉटेल असून रात्री उशिरा एक वाजेपयर्ंत ते सुरू असते. शिवाय सूतगिरणी कामगारांची रेलचेल सुरू असते. वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. या घटनेने सर्वत्र           खळबळ उडाली होती पोलिसांनी चोरटय़ांचा मागोवा घेण्यासाठी  नंदुरबार येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले  होते. मात्र त्यातून पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. घटनेचा उलगडा होण्यासाठी उपअधीक्षक एम.बी.पाटील ,पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकही पाठविण्यात आली होती.
पोलिसांचा तपास सुरू असतानाच केंट, जि.निमज (मध्य प्रदेश) पोलिसांनी येथील पोलिसांना हरियाणा राज्यातील  एटीएम  फोडून जबरी चोरी करणा:या टोळीचा म्होरक्या ताहीर ऊर्फ राजू गफूरखान रा.गुराका  ता.हातींन जिल्हा, पलवल (हरियाणा ) यास अटक केली होती. गफूरखान याने महाराष्ट्रात  शहादा येथेही एटीएम फोडल्याची कबुली दिल्याने निमज पोलिसांनी तात्काळ शहादा पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक दीपक बागुल, हवालदार भरत बाविस्कर  यांच्या पथकाने निमज येथे जाऊन आरोपी  ताहीर ऊर्फ राजू गफूरखान यास शहादा येथे आणले. त्यास न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचे अन्य सहा साथीदार फरार झाले आहेत तपास उपनिरीक्षक दीपक बागुल करीत आहेत.

Web Title: Shahadan ATM breaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.