शहाद्यात वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:38 PM2018-01-13T12:38:23+5:302018-01-13T12:38:33+5:30

Shahadat electricity companies company officials | शहाद्यात वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव

शहाद्यात वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मीटर बसविण्यापूर्वी वीज बिलांची वसुली व मीटर रिडींग न घेता अव्वाचा सव्वा बिले पाठवून ग्राहकांची लूट करणा:या वीज वितरण कंपनीच्या शहादा येथील कार्यालयावर वाडी, चिखली व नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी मोर्चा काढून तब्बल  चार तास कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याने केल्याने अधिका:यांची तारांबळ उडाली. अखेर ग्राहकांना अधिका:यांनी बिलाची रक्कम परत करीत बिलांची चालू रिडींगनुसार दुरुस्ती करुन लेखी पत्र आंदोलनकत्र्याना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
वाडी, चिखली, नर्मदानगर, त:हावद या पुनर्वसन वसाहतीत वीज वितरण कंपनीकडून अवाजवी बिलांची आकारणी सुरु आहे.               वाडी येथील नर्मदा जीवन या             निवासी आदिवासी विद्याथ्र्याच्या शाळेला जास्तीचे बिले देण्यात              आले. सहा ग्राहकांना चक्क वीज  मिटर बसविण्यापूर्वीच बिलांची आकारणी करण्यात आली. त्यातील मालसिंग गुलाबसिंग पावरा व             खेमा रेन्या पावरा या ग्राहकांकडून मीटर बसविण्यापूर्वीच बिलाची  रक्कम वसूल करण्यात आली. कंपनीच्या ठेकेदाराकडून वसाहतीत जाऊन रिडींग न घेता कार्यालयात बसूनच मीटर रिडींग दाखवून अवाजवी बिले वसुल करण्याचा प्रकार सुरु आहे. 
शासनाने पुनर्वसन केलेल्या बाधितांकडून वीज वितरण कंपनीकडून अशाप्रकारे आर्थिक लूट सुरु आहे. यासंदर्भात वीज           कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करुनही दुर्लक्ष होत असल्याने नर्मदा बचाव आंदोलकांचा संयम तुटला. आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, कांतीलाल पावरा, राहत्या पावरा, सुनील पावरा यांच्यासह कार्यकत्र्यानी शहादा वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चात विद्याथ्र्याचाही सहभाग होता. आंदोलनकत्र्यानी या वेळी वीज  बिलांची होळी  केल्यानंतर कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही. कुराडे, उपाभियंता आर.एम. मोरे यांना घेराव घातल्यानंतर कार्यकारी अभियंता भामरे आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकानी घेतला होता. मात्र कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 

Web Title: Shahadat electricity companies company officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.