शहादा पालिका पोटनिवडणुकीत एमआयएमचा उमेदवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:40 PM2017-12-14T17:40:57+5:302017-12-14T17:41:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा पालिकेच्या प्रभाग तीन ब च्या पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराने अपक्ष उमेदवारावर तब्बल 1,525 मतांनी एकतर्फी विजय मिळविला.
शहादा पालिकेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत प्रभाग तीन ब मध्ये सद्दाम तेली हे एमआयएमतर्फे निवडून आले होते. त्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. एमआयएमकडून तेली वसीम सलीम तर अपक्ष म्हणून मिस्तरी अब्दुल नईम अब्दुल हलीम यांनी उमेदवारी केली होती. त्यासाठी 13 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. एकुण एक हजार 789 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकुण दोन हजार 814 मतदान होते जवळपास 63.50 टक्के मतदान झाले होते. मतदानाची मतमोजणी गुरुवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात करण्यात आली. मतमोजणीत एमआयएमचे तेली वसीम सलीम यांना एक हजार 653 मते मिळाली तर अपक्ष मिस्तरी अब्दुल यांना अवघी 128 मते मिळाली. नोटाचा वापर 8 मतदारांनी केला. एमआयएमचे वसीम तेली यांनी एकतर्फ विजय मिळवला. एमआयएमतर्फे निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला.