शहाद्यात पुन्हा भुयार आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:51 PM2019-07-07T12:51:51+5:302019-07-07T12:51:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गणपती मंदिराजवळील भुयार बुजण्यासाठी भरावाचे साहित्य भरुन आणलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉलीखालील जागाही खचल्याने ट्रॉली ...

The Shahara was found again in the gully | शहाद्यात पुन्हा भुयार आढळले

शहाद्यात पुन्हा भुयार आढळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील गणपती मंदिराजवळील भुयार बुजण्यासाठी भरावाचे साहित्य भरुन आणलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉलीखालील जागाही खचल्याने ट्रॉली दुस:या भुयारात पडली. मंदिर परिसरात दोन दिवसात दोन भुयार सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने रात्रीच भराव टाकून भुयार बुजवले.
शहरातील पुरातन गणपती मंदिराच्या मागील बाजूला गुरुवारी पालिका कर्मचा:यांना जलवाहिनीचे लिकेज शोधताना सुमारे पुरुषभर खोलीचे भुयार आढळून आले. हे भुयार मंदिराखालून सुमारे 20 ते 25 फूट लांब असल्याने मंदिराच्या भिंतींनाही तडे गेले होते. भुयार बुजविण्यासाठी शुक्रवारी पालिका कर्मचा:यांनी दगड, विटा, माती, वाळू आणून भरावाचे काम सुरू केले. भरावाचे साहित्य घेऊन आलेली ट्रॅक्टर ट्रॉलीखालील जागादेखील खचल्याने गुरुवारी आढळून आलेल्या भुयारापासून 10 ते 15 फूट अंतरावर दुसरे भुयार आढळून आले. या भुयारात पडलेली ट्रॉली विजेच्या खांबाजवळच पडली. सदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रात्री पावसाचे पाणी भुयारात साचून पुन्हा अनर्थ घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने रात्रीच आठ ते 10 ट्रॅक्टर ट्रॉली मटेरियल भराव टाकून भुयार बुजविले. भुयारात पडलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी पालिका कर्मचा:यांना चांगलीच कसरत करावी लागली. या भुयारामुळे मंदिरातील फरशीही खचल्याने मंदिर प्रशासनाने मंदिरातील फरशा काढून शोध घेतला असता मंदिराखाली सुमारे 30 बाय 30 चौरस फुटाचा खोल खड्डा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 

Web Title: The Shahara was found again in the gully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.