ठाणेपाडा येथे अक्षता पडण्यापूर्वी वधू-वरांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:57 PM2018-04-29T12:57:36+5:302018-04-29T12:57:36+5:30
ठाणेपाडा येथे स्तुत्य उपक्रम : आदिवासी कोकणी समाजातील आठ जोडपी विवाहबध्द
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लगAाच्या दिवशी वधू-वरांनी श्रमदान करून समाजापुढे एक आदर्शन घालून दिला़ पाणी अडवा, पाणी जीरवा अशा घोषणा देत आयुष्याची नवीन सुरुवात करताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वाचे कौतुक होत आह़े
तालुक्यातील ठाणेपाडा येथे ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी कोकणी समाजातील 8 वधू-वरांचे शुभमंगल यावेळी करण्यात आले. विवाह सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून गावाच्या सरपंच भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात येत होती. सकाळी नवरदेवांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी आमदार के.सी पाडवी, डोकरे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, आदिवासी शबरी विकास महामंडळाचे माजी आयुक्त टि.के बागूल, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे उपायुक्त यशवंतराव पवार, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार, उपसरपंच काशिनाथ पवार, नगरविकास विभाग सहसचिव प्रभाकर पवार, पंचायत समितीचे सदस्य देवमन चौरे, पाणी फाऊंडेशनचे सुखदेव भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भरत पाटील, शेतकी संघाचे सभापती बी.के पाटील, डॉ. सयाजी मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, ग्रामसेवक विजय होडगर, सुरेश पवार ग्रामस्थ व वधु-वरांचे नातेवाईक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े अभिनेता आमिर खान याच्या पुढाकाराने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा लोकचळवळीतून घेण्यात येत असून, तालुक्यातील ठाणेपाडा या गावाची निवड स्पर्धेसाठी झालेली आहे. 8 एप्रिल ते 22 मे र्पयत स्पर्धा घेण्यात येत आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो म्हणून वधू-वरांसह व:हाडी मंडळींनी हातात टिक्कम फावडे घेत श्रमदान केले