शनिमांडळ व सुलवाडेत भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:08 PM2019-01-06T19:08:31+5:302019-01-06T19:08:36+5:30

शनिमांडळ/ब्राrाणपुरी : शनी अमावस्येनिमित्त शनि महाराजांच्या भरणा:या यात्रेत यावर्षी दुष्काळाची छाया दिसून आली. अपेक्षेनुरूप भाविक न आल्याने ब:याच दुकानदार ...

Shani Mandal and Holavadite devotees took part in Darshan | शनिमांडळ व सुलवाडेत भाविकांनी घेतले दर्शन

शनिमांडळ व सुलवाडेत भाविकांनी घेतले दर्शन

Next

शनिमांडळ/ब्राrाणपुरी : शनी अमावस्येनिमित्त शनि महाराजांच्या भरणा:या यात्रेत यावर्षी दुष्काळाची छाया दिसून आली. अपेक्षेनुरूप भाविक न आल्याने ब:याच दुकानदार व व्यावसायिकांना फटका बसला. सुलवाडे, ता.शहादा येथे मात्र परिसरातील गावांसह मध्य प्रदेशातील भाविकांनी शनीदेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी पावणे सहा वाजता जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दुपारी सव्वा बारा वाजता पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही शनी महाराजांचे दर्शन घेत महाअभिषेक केला. या वेळी शनि ट्रस्टमार्फत महाप्रसाद म्हणून पिठल भाकरीचं नियोजन केले होते. अपेक्षेनुरूप भाविक नसल्याने स्वयंसेवकांना त्रास सहन करावा लागला नाही. तसेच ट्रस्टचे नियोजन उत्तम असल्याने प्रत्येक भाविकाला मोकळे दर्शन घेता आले. ब:याच व्यावसायिकांना अपेक्षेनुरूप भाविक नसल्याने फटका बसल्याचे सांगण्यात आले. गावातील स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत भाविकांचा त्रास कमी केला.
या वेळी संसार उपयोगी वस्तुचे दुकाने थाटण्यात आले होते. मात्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने महिला वर्गानेही या दुकानांकडे पाठ फिरविली होती. यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर खेळणी विक्रेत्यांसह शेती उपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटण्यात आली होती. मात्र त्यांचीही निराशा झाल्याचे सांगण्यात आले.
सुलवाडेत भाविकांची गर्दी
शनिअमावस्येनिमित्त सुलवाडे, ता.शहादा येथील मंदिरात शनी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. शहादा तालुक्यातील सुलतानपूर-सुलवाडे येथे आजही पुरातन काळातील काहीना काही वस्तू, छोटय़ा-मोठय़ा शिळा येथील नागरिकांना आढळून येतात. येथील सुसरी नदीकाठी सहा महिन्यापूर्वी शनिअमावस्येच्या दिवशी शनी महाराजांची भव्य शिळा ग्रामस्थांच्या निर्दशनास आली. ही शिळा ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थापन केली. या स्थळाला इच्छापूर्ण शनैश्वर धाम हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर येथे परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. शनिवारी शनिअमावस्येनिमित्त सुलवाडेसह सुलतानपूर, मुबारकपूर, खरगोन, आडगाव, बहिरपूर, गोदीपूर, ब्राrाणपुरी, भागापूर, जवखेडा, रायखेड, खेड, चांदसैली आदी गावासह मध्य प्रदेशातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. भृगवंशी परिवारातील महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन करुन बेटी बचाव-बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत याबाबत जनजागृतीही केली. सुलवाडे ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी पुजारी राजेंद्रप्रसाद भार्गव, सरपंच कैलास पवार, उपसरपंच लालसिंग वाघ, माजी सरपंच दिलीप पवार, पोलीस पाटील सचिन पवार, पंडित मुकेश परियाल, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Shani Mandal and Holavadite devotees took part in Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.