शनिमांडळ बंधा:यातून बेकायदेशीर पाणी उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:34 PM2019-07-02T12:34:23+5:302019-07-02T12:34:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील ब्रिटीश कालीन जुन्या तलावातून काही शेतकरी मोटारी लावून पुन्हा पाण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील ब्रिटीश कालीन जुन्या तलावातून काही शेतकरी मोटारी लावून पुन्हा पाण्याचा उपसा खुलेआम करीत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित विभाग डोळे झाक करीत असल्याने संबंधितांवर फौजदार गुन्हा दाखल करण्याची मागणी शनिमांडळसह पंचक्रोशितील शेतक:यांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षी अपु:या पजर्न्यमानामुळे तलावात जेमतेम पाणीसाठा होता. मात्र त्याचाही जानेवारी महिन्यापासून विना परवानगीने उच्च क्षमतेच्या मोटारी बसविल्याने पाण्याचा उपसा रात्रंदिवस करून तलाव पूर्णत: कोरडा ठाक पडला होता. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी गुरा-ढोरांसह पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल झाले होते. आजही कमी-अधीक प्रमाणात पाण्याचे हाल होत आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने तलावाला तीन ते चार फुट पाणी आल्याने गेल्या तीन ते चार दिवसापासून मोटारी सुरू केल्याने पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर उपसा होत आहे.
जोरदार पाऊस कधी येईल याचा कोणताही भरोसा नाही. त्यामुळे तलावात आहे त्या पाण्याचाही उपसा होत असल्याने काही दिवसातच तलाव पुन्हा कोरडा होण्याचे चिन्ह दिसत आहे. तशी स्थिती दूर नसल्याने पाण्यासाठी मोठे हाल होण्याचे चित्र समोर येत आहे. दो-दोन किलोमीटर र्पयत पाईप लाईन केल्याने उपसा बिन दिक्कत सुरू आहे. भविष्यात पाण्याची समस्या उद्भवू नये म्हणून पाटबंधारे विभागाने तातडीने दरवाड घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी गावासह परिसरातील शेतक:यांनी केली आहे.