शनिदर्शनासाठी शनिमांडळ येथे भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:14 PM2017-11-19T12:14:45+5:302017-11-19T12:14:53+5:30

यात्रोत्सव : जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेशातूनही मोठय़ा संख्येने भक्तांची हजेरी

Shankarshandar Shankar Mandalaya Mandalayali | शनिदर्शनासाठी शनिमांडळ येथे भाविकांची मांदियाळी

शनिदर्शनासाठी शनिमांडळ येथे भाविकांची मांदियाळी

googlenewsNext
कमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व जागृत देवस्थान म्हणून परिचीत नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शनिमहाराज यांच्या यात्रोत्सवाला हजारो भाविकांची मांदियाळी होती़ परिसर भाविकांच्या गर्दीने बहरुन निघाला होता़ दिवसभरात साधारणत 80 हजार भाविकांनी दर्शन घेतल़ेशनिवारी शनिअमावस्या असल्याने शनिमांडळ येथील तिर्थस्थळ असलेल्या शनिमंदिरात यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े शनिवारी पहाटेपासून भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती़ सकाळी 9 वाजेर्पयत भाविकांची फारशी गर्दी नसली तरी त्यानंतर मात्र दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती़ शनिमंदिर परिसराऐवजी तिलालीच्या गाव दरवाज्यातून मारोती मंदिरालगत लोखंडी पाईप लावण्यात आले होत़े त्यामुळे नागमोडी वळणाने मंदिरात प्रवेश करुन गाभा:यार्पयत भाविक प्रवेश करीत होत़े मंदिर प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेकडो स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती़ त्यामुळे भाविकांना दर्शन घेणेही सहज शक्य होत होत़े गुजरात, मध्य प्रदेशासह नंदुरबार, दोंडाईचा, शहादा आदी भागातून येणा:या दुचाकी, चारचाकी वाहनांना पुढे जाण्याची परवानगी नसल्याने नदी किनारी असणा:या खाजगी प्राथमिक शाळेच्या आवारात विविध वाहनांना थांबविण्याची सोय करण्यात आली होती़ तेथून भाविक दर्शनासाठी मार्गस्थ होत होत़े शालेय आवारात जागा अपुरी पडू लागल्याने नदीच्या कोरडय़ा पात्रासह रस्त्याच्या दुतर्फा गाडय़ा लावून भाविक शिस्तीने दर्शनासाठी मार्गस्थ होत होत़े दोन्ही ठिकाणी पोलीसांची नेमणूक करण्यात आली असल्याने भाविक भाविकांकडूनही नियमांचे व शिस्तीचे पालन करण्यात येत होत़े

Web Title: Shankarshandar Shankar Mandalaya Mandalayali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.