५० ग्रामरक्षकांनी आडवल्या गावाच्या वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:42 PM2020-04-20T12:42:03+5:302020-04-20T12:42:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस विभाग व ग्रामपंचायतीतर्फे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात पोलीस विभाग व ग्रामपंचायतीतर्फे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी ५० ग्रामरक्षकांची नियुक्यती करण्यात आली असून, त्यांनी गावात येणाऱ्या मुख्य चार रस्त्यावर काटे टाकून ते पूर्णत: बंद केले आहेत. तसेच या चारही मार्गांवर ग्रामरक्षक तंबू उभारून पहारा देत आहेत. या वेळी ग्रामस्थांचेही सहकार्य अपेक्षित आहे.
याबाबत असे की, नंदुरबार शहरात कोरोना विषाणू संक्रमित रूग्ण आढळून आल्याने त्याचे लोन गावापर्यंत पोहोचू नये याची खबरदारी म्हणून रविवारी सकाळपासूनच प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र व ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेऊन गावात ५० ग्रामरक्षकांची नेमणूक केली आहे. या युवकांंना आयकार्ड देखील वाटप करण्यात आले आहे. या वेळी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळणे, तोंडाला मास्क बांधून पहारा करण्याचे सूचना ग्रामरक्षकांना दिली. या वेळी दोन टप्प्यात ग्रामरक्षकांनी आपले कार्य पूर्ण करायचे आहे असेही त्यांना सूचित करण्यात आले आहे.
या वेळी नांदरखेड्याकडे जाणाºया गोमाई नदीवरील पुलावर काटेरी वृक्ष लावून हा मार्गदेखील बंद केला असून, वैजालीकडून गावात येणारा मार्ग, प्रकाशा बस स्थानकाकडून येणारा मार्ग व आसारामजी आश्रमाकडून येणाºया मार्गावर ग्रामरक्षक दलाचे युवक चोख पहारा देत आहेत. या वेळी गावातील शेतकºयांना शेतात जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. यासाठी गावातील ओळखीच्या व्यक्तींना शेतकºयांची ओळख पटविण्यासाठी नियुक्त केले असून, शेतकºयांची ओळख पटल्यानंतरच त्यांना आपापल्या शेतात काम करण्यासाठी ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
ग्रामरक्षक गाव शिवात येणाºया प्रत्येकाची कसून चौकशी करीत असून, त्यांच्याशी विनाकारण हुज्जत घालणाºयांना ते प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात हवलदार गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी यांच्यासमोर उपस्थित करीत आहेत. या वेळी सरपंच सुदाम ठाकरेही या युवकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.
याप्रसंगी बाहेर गावाहून विविध वस्तू विक्रीसाठी येणाºयांना विक्रेत्यांनादेखील गावबंदी घातली असून, सकाळी सहा ते सायंकाळी सहा, सायंकाळी सहा ते सकाळी सहा अशा दोन शिफ्टमध्ये ग्रामरक्षकांना आपले कार्य चोखपणे पार पाडावे लागणार आहे.