महू फुलापासून तयार केलेल्या ३२ व्यंजनांची चवच न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:25 PM2019-04-21T12:25:46+5:302019-04-21T12:25:51+5:30

संडे अँकर । सातपुड्यातील चोंदवाडे येथे भरला महूवा महोत्सव, २०० महिलांचा सहभाग

Shawn of 32 bowls made from mahoo flower | महू फुलापासून तयार केलेल्या ३२ व्यंजनांची चवच न्यारी

महू फुलापासून तयार केलेल्या ३२ व्यंजनांची चवच न्यारी

Next

नंदुरबार : सातपुड्यात कल्पवृक्ष महू महोत्सवाचे यंदाही आयोजन करण्यात आले होते़ चोंदवाडे बुद्रुक येथे झालेल्या महोत्सवात २६ गावातील महिलांनी सहभाग घेतली होती़ यावेळी महिलांनी महू फुलांपासून तयार केलेल्या विविध व्यंजनाची चव चाखण्यासाठी पर्यटकांनी भेट दिली होती़ या पदार्थांची पर्यटकांनी मनमुराद तारीफ करत त्यांची माहिती घेतली़
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, बायफ मित्र संस्थेच्या महाराष्ट्र जीन प्रकल्प यांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला़ यात चोंदवाडे बुद्रुक, चोंदवाडे खुर्द, खरवड, आंबारी, बिलबारा, बोरवण, वडफळ्या, रोषमाळ बुद्रुक, कात्री, माकडकुंड, मनखेडी, बिजरी, उमराणी, छापरी, शेलकुवी, कुवरखेत, दरा, चिंचोरा, भोगवाडे आदी २६ गावातील २०० महिला उपक्रमात सहभागी झाल्या होत्या़ यावेळी महोत्सवाचे प्रवर्तक नाना पावरा, दिलीप वसावे, नमु पावरा, लिलेश चव्हाण, प्रा़डॉ़ एच़एम़पाटील, प्रा़ हरीभाऊ पवार, राजेश देवकर, राकेश पावरा, कविता वळवी, सविता पावरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ २६ गावातील महिलांनी ३२ प्रकारचे खाद्यपदार्थ यावेळी तयार करुन आणले होते़ यात महू भाजी, महू शरबत, लाडू, हिते, चरणी, भाजलेले महू, राबडी, महू फुलांचे बोंडे, चिचोडे, चकल्या, मोवणी, डुकल्या, महू लस्सी, पोळ्या, पुरी, बुंदी, गुलाब जामून, पेठे, खीर, सांजोऱ्या, ऊसळ, बडा चांन्त्या आदी व्यंजने तयार करुन आणली होती़
दरम्यान महूपासून तयार करण्यात येणाºया काही पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली़ सविता पावरा, ज्योती पावरा, सुनंदा पावरा, कविता वळवी या महिलांनी खाद्यपदार्थांचे गुणधर्म विषद केले़ महूचे आरोग्यवर्धक गुणधर्म याविषयावरही येथे चर्चा करण्यात आली़

Web Title: Shawn of 32 bowls made from mahoo flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.