खरवड शिवारात बिबटय़ाच्या हल्ल्यात मेंढय़ा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:05 PM2018-06-05T13:05:00+5:302018-06-05T13:05:00+5:30
शेतकरी चिंतेत : खरवड शिवारातील घटना
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 5 : तळोदा तालुक्यातील खरवड शिवारात बिबटय़ाने दुपारच्या वेळी दोन मेंढय़ांवर हल्ला चढवत त्यांना ठार केल़े सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ अनेकांनी बिबटय़ाला पाहिल्याचे सांगितले असून बिबटय़ाचा संचार सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत़
ऐचाळे ता़ साक्री येथील मेंढपाळ कुटूंब गेल्या काही दिवसांपासून खरवड गावालगत मुक्कामास आह़े सोमवारी दुपारी मेंढपाळ दगा ठेलारी मेंढय़ांना पाणी देण्यासाठी खरवड गावाजवळील राजेंद्र गोसावी यांच्या ऊसाच्या शेतात घेऊन गेले होत़े मेंढय़ा पाणी पित असताना अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने दोन मेंढय़ांवर वार करत त्यांना ठार केल़े अचानक झालेल्या या हल्ल्याने मेंढपाळ दगा ठेलारी यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली़ यावेळी परिसरात असलेले पंचायत समिती सदस्य नंदूगीर गोसावी, संजय गोसावी, मोहनगीर गोसावी यांनी धाव घेतली़ परंतू तोवर बिबटय़ा दोघा मेंढय़ांना ओढून शेतात घेऊन गेला होता़ यावेळी खरवड गावातील काहींनी लाठय़ाकाठय़ा घेऊन ऊसात शोध घेण्याचा प्रयत्न केला़ यात एका मेंढीचे धूड त्यांच्या हाती लागल़े भरदुपारी बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामुळे खरवड, मोड आणि बोरद परिसर हादरून गेला आह़े या भागात ब:याच दिवसांपासून वन्यप्राणी दिसून येत नसल्याने शेतकरी चिंतामुक्त होत़े आता पुन्हा वन्यप्राण्यांचा संचार सुरू झाल्याने चिंता वाढल्या आहेत़
या घटनेनंतर मेंढपाळ दगा ठेलारी यांच्यासह ग्रामस्थांनी बोरद व तळोदा येथील वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना माहिती दिली होती़ मात्र सायंकाळपर्यत अधिका:यांनी याठिकाणी भेट दिली नसल्याचे सांगण्यात आले आह़े तळोदा तालुक्यात गेल्या काही वर्षात बिबटय़ाचा संचार वाढीस लागला आह़े ऊस आणि केळीच्या शेतात मुक्काम करणा:या बिबटय़ांमुळे मजूर कामावर येत नसल्याचे प्रकार घडतात़ चार ते पाच वर्षापूर्वी बिबटय़ाच्या हल्ल्यात आमलाड येथे पशुपालक बालक ठार झाल्याची घटना घडली होती़ यानंतर सातत्याने तळोदा तालुक्याच्या विविध भागात बिबटय़ाच्या हल्ल्यात पाळीव जनावरे ठार झाले आहेत़
तळोदा बिबटय़ाचा संचार थांबवण्यासाठी वनविभागाने ठोस कारवाई करण्याची अपेक्षा शेतक:यांची असून येत्या काळात पुन्हा बिबटय़ाचा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े