तिने पाहिलं.. आणि मने जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:08 PM2020-01-21T12:08:20+5:302020-01-21T12:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : युवारंग महोत्सव. दरवर्षीचा महोत्सव़़़ यंदा महोत्सवात उपस्थिती होती ती ‘मितवा’ चित्रपटातील व ‘पवित्र रिश्ता’ ...

She watched .. and won the mind | तिने पाहिलं.. आणि मने जिंकली

तिने पाहिलं.. आणि मने जिंकली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : युवारंग महोत्सव. दरवर्षीचा महोत्सव़़़ यंदा महोत्सवात उपस्थिती होती ती ‘मितवा’ चित्रपटातील व ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची. तिची झलक, तिची अदा तसेच बोलणे या सर्वांवर फिदा झालेली तरूणाई़़़ होय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व शहादा येथील पूज्य साने गुरूजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंगाच्या युवक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हे सारे दिसले.
सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बक्षीस वितरण कार्यक्रमाला येणार म्हणून तरूण-तरूणींमध्ये चैतन्य संचारले होते़ सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रमाला प्रारंभ झाला़ हळूहळू मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होत गेली. तर दुसरीकडे तरूणाई अभिनेत्री प्रार्थना बेहेरे येणार या उत्सुकतेत त्यांच्या हृदयाचे ठोके धडधडत होते अन् काही क्षणानंतर ‘ती आली, तिने पाहिलं आणि सर्वांची मने जिंकली.’
सेल्फीसाठी तो चक्क
रंगमंचाकडे धावला
फ्लार्इं कीस देत प्रार्थना बेहेरे हिने एन्ट्री करताच जल्लोष झाला़ तिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली़ नंतर ती रंगमंचाकडे आल्यावर कार्यक्रमाला सुरूवात झाली़ मात्र आपल्याला गर्दीमध्ये सेल्फी काढता आला नाही म्हणून गणेश जोशी नामक युवकाने चक्क भर कार्यक्रमात रंगमंचावर धाव घेतली आणि प्रार्थना बेहरे हिच्यासोबत सेल्फी काढला़ नंतर त्यास रंगमंचावरून खाली उतरविण्यात आले़ काही वेळानंतर प्रार्थना बेहेरे यांनी त्याला पुन्हा रंगमंचावर बोलवून त्याच्या हिंमतीला दाद दिली़ मात्र त्यास ‘सॉरी’देखील म्हणायला लावले़ युवारंगच्या सभामंडपात प्रार्थना बेहेरे ही आल्यानंतर तिला पाहण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रचंड गर्दी केली होती़
‘इशारो-इशारो मैं’ सुरू होते संभाषण
अभिनेत्रीसोबत फोटो मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून रंगमंचाकडे गर्दी केली जात होती़ सेल्फी मिळावी यासाठी विद्यार्थी व प्रार्थना बेहेरे यांच्यामध्ये इशारो-इशारो मैं सभाषण सुरू होते तर विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांनी धमाल केली़
युवारंग गाण्यावर थिरकले पावले
कार्यक्रमात अधून-मधून युवारंग गीत लावण्यात येत होते़ या गीतावर बेधूंद होवून तरूणाई थिरकत होती़ या वेळी सभामंडप फुल्ल झाले होते.

Web Title: She watched .. and won the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.