शंख, घंटा, थाळी आणि टाळीनादाने दुमदुमले नदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:48 PM2020-03-23T12:48:50+5:302020-03-23T12:48:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसभर जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या नागरिकांनी सायंकाळी टाळी, थाळी, घंटा आणि शंखनाद करुन गो-कोरोना-गो ...

 The shells, bells, plates, and sackcloths swell | शंख, घंटा, थाळी आणि टाळीनादाने दुमदुमले नदुरबार

शंख, घंटा, थाळी आणि टाळीनादाने दुमदुमले नदुरबार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवसभर जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या नागरिकांनी सायंकाळी टाळी, थाळी, घंटा आणि शंखनाद करुन गो-कोरोना-गो अशी साद घातली़ सुमारे १५ मिनीटे सुरु असलेल्या या उपक्रमानंतर नागरिक पुन्हा घरात विसावले़
नंदुरबार शहरातील सराफ बाजार, ईलाही चौकासह शहरातील इतर मुस्लिम बहुल भाग, जळका बाजार, देसाईपुरा, साक्री नाका, नेहरु चौक, गिरीविहार, सिंधी कॉलनी तसेच शहराच्या चहूबाजूने विस्तारलेल्या रहिवासी वसाहती, ग्रामीण हद्दीतील रहिवासी वसाहतींत ‘नाद’ करण्यात मोठा उत्साह होता़ यात प्रामुख्याने महिलांचा मोठा सहभाग होता़ १५ मिनीटांपर्यंत विविध साहित्यासह डफ आणि ढोलचा नाद केल्यानंतर नागरिकांनी राष्ट्रगीत गाऊन समारोप केला़ यावेळी त्यांनी दिलेल्या भारतमाता की जय आणि वंदेमातरमच्या घोषणांना वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते़ यानंतर मात्र काही वेळातच पुन्हा घरात जाणे नागरिकांनी पसंत केले़ नंदुरबार शहरासोबतच तालुक्यातील कोळदे, पातोंडा, शिंदे, शनिमांडळ, लहान शहादे, कोरीट यासह विविध गावांमध्ये कर्फ्यूत मोेठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला होता़ रविवार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना फाटा देत घरीच राहणे पसंत केले़ बºयाच जणांनी पहाटे शेतात फेरफटका मारुन सात वाजेपूर्वी घरात थांबणे पसंत केले़ पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये सायंकाळी पाच वाजता थाळीनाद करुन ग्रामस्थांनी कोरोनाविरोधात लढा कायम राहील असे सांगितले़
नंदुरबारसोबत तळोदा, शहादा, नवापुर, धडगाव याठिकाणी थाळीनाद करत नागरिकांनी गो-कोरोना-गोचा घोषा लावला होता़
शहादा शहरातील तूपबाजार, मुख्य बाजारपेठ, मोहिदा रोड, डोंगरगाव रस्ता, मलोणी व लोणखेडा परिसरासह शहरालगतच्या विविध रहिवासी वसाहतीत पाच वाजता थाळीनाद करुन नागरिकांनी कोरोना गोचा नारा दिला़ शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते. पहिल्यांदाच एवढा कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे जुन्या जाणत्या नागरिकांकडून सांगण्यात आले़ ग्रामीण भागातही थाळीनादाला प्रतिसाद देण्यात आला़

Web Title:  The shells, bells, plates, and sackcloths swell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.