शिर्डीला बंदोबस्तावरील कर्मचारी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:17 PM2020-04-16T12:17:04+5:302020-04-16T12:17:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिल्ह्यातील एक अधिकारी व १४ पोलीस कर्मचाऱ्यांची नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई संस्थान येथे ...

Shirdi returned to the settlement staff | शिर्डीला बंदोबस्तावरील कर्मचारी परतले

शिर्डीला बंदोबस्तावरील कर्मचारी परतले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जिल्ह्यातील एक अधिकारी व १४ पोलीस कर्मचाऱ्यांची नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई संस्थान येथे बंदोबस्तासाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती १५ दिवसाची असली तरी या सर्व कर्मचाऱ्यांनी सुमारे महिनाभर तेथे आपली सेवा दिल्यानंतर रविवारी ते आपापल्या घरी दाखल झाले. या सर्व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या १३ मार्च रोजीच्या आदेशान्वये १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थांनाच्या मंदिराला सुरक्षा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील नंदुरबार शहर, शहादा, म्हसावद, नवापूर, नंदुरबार उपनगर, नंदुरबार शहर वाहतूक शाखा व पोलीस मुख्यालय नंदुरबार याठिकाणी कार्यरत असलेल्या १५ कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. या कर्मचाºयांना नियुक्तीसाठी रवाना होताना आपले ओळखपत्र, लाठी व सर्विस रिवाल्वर आदी महत्त्वपूर्ण बाबी सोबत घेऊन शिर्डी पोलीस ठाण्याला रिपोर्र्टींग केल्यानंतर मंदिर परिसरात सुरक्षा कर्मचारी म्हणून हजर होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते.
त्यानुसार सर्व १५ कर्मचारी शिर्डी येथील साईबाबा मंदिरात सुरक्षेसाठी हजर झाले. या सर्वांचा कालावधी ३१ मार्चला संपणार होता. मात्र राज्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली संचारबंदी व पंतप्रधानांनी १४ एप्रिलपर्यंत जाहीर केलेले लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे या सर्व कर्मचाºयांना १३ एप्रिलपर्यंत सुमारे महिनाभर शिर्डी येथील साईबाबा मंदिरात ड्युटी करावी लागली. या सर्व कर्मचाºयांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली होती.
नियुक्तीचा कालावधी १५ दिवसांसाठी असतांना देशात परिस्थिती बदलल्यामुळे या कर्मचाºयांनी महिनाभर शिर्डी साईबाबा मंदिर येथे सेवा पुरविल्यानंतर आपापल्या गावी परतले. या सर्व कर्मचाºयांची शिर्डी येथून आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे.

Web Title: Shirdi returned to the settlement staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.