दहिंदुल येथे दु:खातून सावरण्यासाठी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:15 PM2018-04-26T13:15:56+5:302018-04-26T13:15:56+5:30
बांधला बंधारा : दहिंदुले येथील कुटुंबाचा आदर्श उपक्रम
वसंत मराठे ।
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : मयताचे दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम संपल्यानंतर 12 दिवस दुखवटा पाळणा:या त्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी बाहेर काढून नेण्याची प्रथा मराठा समाजात आहे. या खर्चिक व निरुपयोगी प्रथेस फाटा देऊन दहिंदुले, ता.नंदुरबार येथील काळे कुटुंबाने आपले नातेवाईक अन् गावक:यांसह गावाजवळील एका शेतात जाऊन तेथे शंभर ते दीडशे मीटरचा मातीचा बांध श्रमदातून बांधला. विशेष म्हणजे श्रमदानात महिलाही सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या या अनिष्ट प्रथेस प्रथमच काळे परिवाराने आळा घातल्याने या कुटुंबाचे कौतुक केले जात असून, इतरांनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे.
अत्यंत रूढीप्रिय समाज म्हणून जिल्ह्यातील मराठा समाज ओळखला जात असतो. समाजातील या अनिष्ट रुढी नष्ट करण्यासाठी समाजाच्या सामाजिक संघटनादेखील सातत्याने प्रय} करीत आहे. त्यात काही अत्यंत खर्चिक रुढींवर व्यसन घालण्यातही संघटनांना यश आले आहे. तथापि अजूनही काही खर्चिक रुढी समाजात आजही सुरू आहेत. समाजातील मयत व्यक्तीचा दशक्रिया विधी व उत्तर कार्याचा कार्यक्रम संपल्यानंतर गेली 12 दिवस दुखवटा पाळणा:या संपूर्ण कुटुंबास त्यांचे जवळचे नातेवाईक बाहेर नेत असतात. अर्थात यामागे दु:खी कुटुंब आपले दु:ख विसरून पुन्हा त्यांचे खंडित कामकाज सुरळीत करावे असा हेतू असतो. मात्र या प्रथेमुळे नातेवाईकांचाही वेळ व पैसा जात असतो. साहजिकच ही प्रथा खर्चिक अन् निरूपयोगी ठरत आहे. परंतु समाजात ती आजही वर्षानुवर्षे सुरू आहे.
समाजातील हा अनिष्ट पायंडा नंदुरबार तालुक्यातील काळे परिवाराने मोडला आहे. त्यांच्या कुटुंबातील तोताराम लकडू काळे यांच्या प}ी भागाबाई तोताराम काळे यांचे निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम मंगळवारी पार पाडला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर मयताच्या कुटुंबाला बाहेर काढून नेण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक थांबले होते. या वेळी घरातीलच गावाचे उपसरपंच दीपक काळे यांनी बाहेर नंदुरबारला न जाता गावात वॉटर कप स्पर्धे अंतर्गत सुरू असलेल्या कामावर श्रमदान करण्याची कल्पना घरातील बुजूर्ग व्यक्तींपुढे मांडली. या व्यक्तींनी कुठलेही फाटे न फोडता तत्काळ होकार दिला. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब आपल्या नातेवाईकांसह गावाजवळीलच वसंत माळी यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी शंभर ते दीडशे मीटरचा मातीबांध श्रमदानातून बांधला. जवळपास सायंकाळपावेतो कुटुंबाने श्रमदान केले होते. विशेष म्हणजे कुटुंबासोबत महिलांनी सुद्धा श्रमदान केले. या वेळी प्रा.पांडुरंग गायकवाड, बलराम कुसारे, काशीनाथ कदम, प्रवीण कदम, भटू शेळके, दीपक माळी, मयूर माळी, कैलास माळी, जगन्नाथ न्हावी, योगेश कदम, सुनील आहेर आदींसह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.