शहादा येथे श्रीकृष्ण पुराण कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:45+5:302021-01-18T04:28:45+5:30
श्री नारायण भक्ती पंथामार्फत मोहिदेतर्फे हवेली शिवारातील खेतिया रस्त्यावरील श्रीनारायणपूरम येथे भारतातील दुर्लभ आणि दिव्य भव्य मंदिर ...
श्री नारायण भक्ती पंथामार्फत मोहिदेतर्फे हवेली शिवारातील खेतिया रस्त्यावरील श्रीनारायणपूरम येथे भारतातील दुर्लभ आणि दिव्य भव्य मंदिर या परिसरात निर्माण केले जाणार आहे. चार एकर क्षेत्रात ३६ हजार स्क्वेअर फूट जागेत केरळ येथे असलेल्या पद्मनाभम श्रीनारायण मंदिरासारखी ११ फूट उंचीची शेषशायी विष्णू भगवानची अष्टधातूची मूर्ती या मंदिरात स्थापित करण्यात येणार आहे. संतश्री लोकेशानंद महाराजांच्या संकल्पनेतून निर्माण होणारे भारतातले हे पहिले व एकमेव मंदिर राहणार असून, यामुळे परिसराला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.
सुमारे चार एकर परिसरात या तीर्थक्षेत्राची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी राजस्थान येथील विशेष प्रकारचे खडक व दगड आणण्यात आले असून, त्यावर नक्षीकाम करण्यासाठी संगणकीकृत व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे तीर्थक्षेत्र दक्षिण भारतीय पद्धतीच्या मंदिराप्रमाणे बनविण्यात येणार असून, मुख्य मंदिराची १७५ फूट लांबी ११९ फूट रुंदी व ९० फूट उंची असणार आहे. श्रीविष्णू नारायणांची मूर्ती ११ फूट उंच असून, सुमारे २१ टन वजनाची अष्ट धातूपासून मूर्तीची निर्मिती करण्यात येणार आहे. शेषशाही प्रकारातील विष्णू अवतार असणार आहे. हे मंदिर पहिल्यांदाच निर्माण होत असल्याची माहिती या वेळी स्वामीनारायण भक्ती पंथाचे श्री लोकेशानंद महाराज यांनी दिली.
१८ ते २४ जानेवारीदरम्यान आयोजित या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहून कथेचा व महापूजेचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नारायण भक्ती पंथातर्फे करण्यात आले आहे.
(नोट- हेडिंगमध्ये कृष्ण पुराण म्हटलेय आणि बातमीत विष्णू पुराण म्हटलेय, कृपया बातमी पाहून घेणे)