नंदुरबारात कडकडीत बंद, आंदोलकांनी ठिकठिकाणी टायर जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:53 PM2018-07-30T12:53:18+5:302018-07-30T12:54:36+5:30

Shutting the tires in Nandurbar, the protesters burned the tires at the spot | नंदुरबारात कडकडीत बंद, आंदोलकांनी ठिकठिकाणी टायर जाळले

नंदुरबारात कडकडीत बंद, आंदोलकांनी ठिकठिकाणी टायर जाळले

Next
<p>नंदुरबार : मराठा आरक्षण मागणीसाठी सोमवारी आयोजित नंदुरबार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी बंदचे आवाहन करणा:यांनी काही ठिकाणी टायर जाळले. काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. परंतु पोलीस प्रशासन आणि आंदोलक नेत्यांनी संयमाची भुमिका घेतल्याने आंदोलन चिघळले नाही. दरम्यान, रास्तारोको व ठिय्या आंदोलन ऐनवेळी रद्द करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्यातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी बंदचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला होता. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबार आगारातील सर्व बसफे:या देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा सुरू असल्या तरी केवळ शिक्षक उपस्थित होते. दवाखाने व औषधी दुकाने सुरू होती. 
सकाळी बंदचे आवाहन करणा:या जमावाने बसस्थानक परिसर, नाटय़गृह, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली यासह ठिकठिकाणी टायर जाळले. यामुळे वाघेश्वरी चौफुलीवर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जमावातील काहींनी रस्त्यावरील उभ्या वाहनांना लक्ष करून काही वाहनांची तोडफोड देखील केली. पोलिसांनी आणि आयोजक नेतृत्वाने संयमाची भुमिका घेतल्याने परिस्थिती चिघळली नाही.
जमावाची आक्रमकता पाहून आयोजकांनी दिवसभरातील सर्व आंदोलने स्थगित केली. त्यामुळे केवळ शिष्टमंडळाने जावून तहसीलदारांना निवेदन दिले. 
दरम्यान, शहरभर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. 

Web Title: Shutting the tires in Nandurbar, the protesters burned the tires at the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.