डामरखेडा व शिरुड दिगरला साध्या पद्धतीने विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:50 PM2020-04-22T12:50:47+5:302020-04-22T12:50:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करीत तालुक्यातील डामरखेडा व शिरुड दिगर येथे दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करीत तालुक्यातील डामरखेडा व शिरुड दिगर येथे दोन शेतकरी कुटुंबातील विवाह साध्या पद्धतीने पार पडले.
शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील स्वातंत्र्य सैनिक कै.रामजी पुरुषोत्तम पाटील यांची नात व कै.चंद्रशेखर यांची कन्या चि.सौ.कां.मेघा हिचा विवाह मोहिदेतर्फे हवेली, ता.शहादा येथील मनोहर सखाराम पटेल यांचे पुत्र चि.गौरव यांच्यासोबत दोन महिन्यापूर्वी निश्चित करण्यात आला होता.
दुसरा विवाह सोहळा डामरखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन शंकर लक्ष्मण पाटील यांचा पुतण्या चि.भावेश अनिल पाटील याचा विवाह शिरूड दिगर, ता.शहादा येथील गोविंद भिला पाटील यांची कन्या चि.सौ.कां.मनिषा यांच्यासोबत ठरला होता. विवाह ठरलेल्या वधू-वरांच्या कुटुंबांकडून तयारी झाली होती. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासह शासनाने दिलेले नियम पाळून हे दोघेही विवाह अत्यंत साध्या पध्दतीने घरगुती वातावरणात पार पडले. मेघा व गौरव यांचा विवाह डामरखेडा येथे तर भावेश व मनिषा यांचा विवाह शिरूड दिगर येथे पार पडला.