कोटीच्या गटशेती योजनेसाठी एकच प्रस्ताव : नंदुरबार जिल्हा कृषी विभागाची उदासिनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:50 PM2017-12-08T12:50:45+5:302017-12-08T12:50:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गटशेतीची चळवळ अधिक प्रगल्भ होऊन शेतक:यांना आधार मिळावा, यासाठी शासनाने एक कोटी रूपये अनुदानाची गटशेती योजना सुरू केली होती़ गेल्या महिन्यात मुदत संपलेल्या या योजनेसाठी जिल्ह्यातून केवळ एकच प्रस्ताव प्राप्त झाला आह़े़
दोन लाख 72 हजार हेक्टर शेतीक्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गटशेतीची संकल्पना अद्यापही मर्यादित आह़े जिल्ह्यात नोंदणीकृत असे 750 गटशेती गट आहेत़ त्यांच्याकडून खरीप आणि रब्बी या दोन हंगामात गटशेती करून उत्पादन घेतले जात़े या गटांसोबतच नव्याने गट स्थापन होऊन गटशेतीतून कृषी उद्योजकता ही आणखी एक नवी संकल्पना घेत शासनाने गटशेतीसाठी एक कोटी रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती़ या घोषणेनंतर 2017 मध्ये योजना सुरू झाली़ मात्र या योजनेत जिल्ह्यातील गटांनी सहभागच नोंदवला नसल्याने जिल्ह्यासाठी आलेले अनुदान परत जाणार आह़े