नंदुरबारात एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 03:08 PM2018-08-05T15:08:40+5:302018-08-05T15:08:47+5:30
प्रायोगिक तत्वानंतर दंडात्मक कारवाई करणार
नंदुरबार : आजपासून शहरातील रहदारीच्या तीन मुख्य रस्त्यांवर एकेरी वाहतूक मार्ग तर पाच रस्त्यांवर समविषम पार्क्ीगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुरुवातीचे आठ दिवस वाहनचालकांमध्ये यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर मात्र, अंमलबजावणी न करणा:या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा आहे.
नंदुरबारातील अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण व वाहणांची बेसुमार वाढलेली संख्या यामुळे वाहतुकीचे नियोजन वेळोवेळी कोलमडत आहे. वाहतूक शाखेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना व दंडात्मक कारवाई करूनही वाहनचालक शिस्त व वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.
ही बाब लक्षात घेता शहर वाहतुक शाखेने याबाबत आता कठोर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तीन मुख्य रहदारीच्या मार्गावर एकेरी वाहतूक तर पाच मार्गावर समविषम पार्क्ीगची अंमलबजावणी येत्या 5 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर करण्यात येत आहे.
मुख्य रहदारीची समस्या असलेल्या रस्ते व चौकांमध्ये नगरपालिका चौक, मंगळ बाजार, सुभाष चौक, अमृत चौक, घी बाजार, गांधी पुतळा, हाटदरवाजा, गणपतीमंदीर, जळका बाजार, सुभाष चौक, अमृत चौक, घी बाजार, गांधी पुतळा, हाटदरवाजा, गणपती मंदीर, जळका बाजार, शिवाजी चौक, माणिक चौक, सिंधी कॉलनी यासह इतर रस्ते व चौकांचा समावेश आहे.
सम-विषम पार्क्ीग
सम-विषम पार्क्ीगसाठी पाच रस्ते निवडण्यात आले आहेत. एक दिवसाआड एका बाजुला वाहने उभी करता येणार आहेत. त्यात नेहरू पुतळा ते जुनी नगरपालिका चौक या रस्त्यावर रोटरी वेलनेस सेंटर, नगरपालिका ही बाजू डावी बाजू राहील तर त्याच्या समोरची बाजू ही उजवी राहणार आहे.
नगरपालिका चौक ते बडोदा बँक एटीएमर्पयतच्या रस्त्यावर बटेसिंहभैय्या रघुवंशी व्यापारी संकुल, आमदार कार्यालय, अंधारे हॉस्पीटल ही बाजू डावी तर त्यासमोरील बाजू ही उजवी राहणार आहे.
शास्त्री मार्केट चौक ते चंद्रकला साडी सेंटर या रस्त्यावर दोन्ही बाजुला सम-विषम पार्क्ीग राहणार आहे.
अरिहंत कलेक्शन ते जीजाजी शूज व समोरील डी.जे.मॅचींग सेंटर ते पटराणी साडी सेंटर या ठिकाणी सम-विषम पार्क्ीग राहील.
गांधी पुतळा ते हाट दरवाजा या चौकादरम्यान होणारी वाहतूक पहाता नारायण एजन्सी ते पुष्पांजली एजन्सी, सचिन एजन्सी ते पाणपोईर्पयत सम-विषम पार्क्ीग राहील.
पालिकेतर्फे फलक लावणार
या उपक्रमासाठी पालिकेचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. पालिकेतर्फे त्यासाठी ठिकठिकाणी फलक व बोर्ड लावण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले.
सिगअल यंत्रणा अशक्य
शहरातील रस्त्यांची व चौकांची रुंदी व झालेले अतिक्रमण पहाता सिगअल यंत्रणा शक्य नाही. यापूर्वी पालिकेने सिगअल यंत्रणेसाठी सव्र्हेक्षण देखील केले होते. परंतु संबधीत संस्थेने येथे ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक स्तरावरील उपाययोजनांच्या माध्यमातूनच शहरातील रहदारीची समस्या सुटू शकणार आहे. त्यादृष्टीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक गिरीश पाटील हे प्रयत्नशील आहेत.