भावाची शिक्षा झाली बहिणीला

By Admin | Published: February 15, 2017 11:14 PM2017-02-15T23:14:32+5:302017-02-15T23:14:32+5:30

तरुणीचा विनयभंग : कवली येथील तरुणाविरुद्ध गुन्हा

Sister received punishment after sister | भावाची शिक्षा झाली बहिणीला

भावाची शिक्षा झाली बहिणीला

googlenewsNext

नंदुरबार : भावाने दुसºया समाजाच्या मुलीशी लग्न केल्याची शिक्षा त्याच्या बहिणीला मिळाली. युवकाने तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना कवली, ता.अक्कलकुवा येथे घडली.
कवली येथील १९ वर्षीय तरुणीच्या भावाने दुसºया जातीच्या मुलीशी विवाह केला आहे. ही बाब गावातीलच इंद्रसिंग दौलत तडवी यांना खटकत होती. त्याचा बदला घेण्यासाठी इंद्रसिंग याने तरुणी तिच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यात शौचासाठी जात असताना तिला अडविले. तिला तिच्या भावाने केलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारत गालावर चापट मारली. तिचा हात धरून ताणून नेत जवळच्याच दादरच्या शेतात तिचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीने त्याच्या तावडीतून सुटून घर गाठले. तिच्या फिर्यादीवरून इंद्रसिंग दौलत तडवी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणास लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sister received punishment after sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.