नंदुरबारला परिस्थिती सुरळीत
By admin | Published: June 3, 2017 01:57 PM2017-06-03T13:57:26+5:302017-06-03T13:57:26+5:30
ग्राहकांना दिलासा मिळला आहे.
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 3 - शेतक:यांनी संप मागे घेतल्याने नंदुरबारला स्थिती सुरळीत होऊ लागली आहे. भाजीपाल्याचेही दर नियंत्रणात येत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळला आहे.
शेतक:यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरांमध्ये चौपटीने वाढ झाली होती.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सकाळपासून एकही शेतकरी फिरकला नव्हता. भाजीपाल्याची आवक झाली नव्हती. बाजारात लिलाव व्हावा, यासाठी स्थानिक भाजीपाला व्यापा:यांनी बाहेरील व्यापा:यांकडून किरकोळ मालाची आवक करून घेतली होती़ यात कोथिंबीर, टमाटे, मिरच्या, गवार आणि वांगे या मालाचा समावेश होता़ शेतक:यांच्या संपामुळे किरकोळ बाजारात सकाळी सात वाजेपासून टमाटा 40 ते 45 रूपये किलो, कोथिंबीर 100 रूपये किलो, कांदे 20 रूपये किलो, बटाटे 30 रूपये किलो, मेथी 70 रूपये किलो दराने विक्री होण्यास सुरूवात झाल्याने भाजीबाजारात आलेल्या सामान्यानी काढता पाय घेतला होता़ शनिवारीही काहीसी तशीच स्थिती होती. मात्र संप मिटल्याचे समजल्यानंतर काहीसे भाव कमी झाले.
भाजीपाला बाजारासोबत फळ बाजारालाही संपाचा फटका बसला आह़े शेतक:यांच्या भाजीपाल्यासोबत फळ आणणा:या गाडय़ाही येत नसल्याने अनेक ठिकाणी फळांची आवकही कमी झाली आह़े यामुळे फळबाजारात दरवाढ दिसून आली़