किसान सभेच्या पाणी परिषदेत पूर्व भागातील टंचाईवर सहा ठराव मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:18 PM2018-04-06T12:18:00+5:302018-04-06T12:18:00+5:30

Six council resolutions on the eastern region's water conventions are approved for the Kisan Sabha water council | किसान सभेच्या पाणी परिषदेत पूर्व भागातील टंचाईवर सहा ठराव मंजुर

किसान सभेच्या पाणी परिषदेत पूर्व भागातील टंचाईवर सहा ठराव मंजुर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील पूर्व भागातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करावी, तापी-बुराई उपसा योजना तातडीने पुर्ण करावी यासह एकुण सहा ठराव घोटाणे येथे आयोजित पाणी परिषदेत करण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभा आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी घोटाणे येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्ष कॉम्रेड जयसिंग माळी होते. परिषदेचे संचलन शेतमजूर संघटनेचे नेते कॉम्रेड नथ्थू साळवे यांनी केले. किसान सभेचे नेते आणि शेतकरी सुकाणू समितीचे निमंत्रक कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण रामराजे, स्थानिक सरपंच यांच्यासह जलसिंचनातील तज्ज्ञ उपस्थित होते.
यावेळी डॉ.अजीत नवले यांनी पूर्व भागातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यासाठी प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. अनेक वर्षापासून पाण्याअभावी शेतीतील उत्पादनात घट होत आहे. कोरडवाहू शेती परवडेनाशी झाली असली तरी उपजिविकेचे दुसरे साधन नसल्याने शेतक:यांचा नाईलाज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ताण सहन करावा लागत आहे. प्रकाशा बॅरेजमधील साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी तापी-बुराई सिंचन योजना मंजुर आहे परंतु तिच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासकीय उदासिनता याला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विविध सहा ठराव मंजुर
यावेळी विविध ठराव करण्यात आले. त्यात तापी-बुराई उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करून पुर्ण करावी. योजनेसाठी पुरेसा निधी खास बाब म्हणून अदा करावा. गावोगावच्या तलावातील आणि बलसाणे धरणासारख्या या भागातील धरणांमधील गाळ उपसून त्यांची खोली वाढवावी. नादुरूस्त के.टी.वेअर दुरूस्त करून त्यांच्या दरवाजा, पाटय़ा नव्याने बसवाव्या. आवश्यक तेथे नदी-नाल्यातील गाळ उपसून जागोजागी बंधारे बांधावे, अवैज्ञानिक, घातक पद्धतीचा वापर करून त्यांची खोली-रुंदी वाढवू नये. तालुक्यातील पूर्व भागाचा हायड्रोजीऑलॉजिकल  सव्र्हे करून संपुर्ण भागासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा आणि वनसंवर्धनाचा आराखडा तयार करा. याकरीता या भागातील युवक-युवतींना प्रशिक्षीत करून त्यांना वेतनासह असे सव्रेक्षण आणि वनसंवर्धन करण्याचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. सर्व कामे मनेरगामधून त्वरीत सुरू करावी. आवश्यक त्या ठिकाणी यंत्राचा उपयोग करून पावसाळ्यापूर्वी ती कामे पुर्ण करावी. आदी ठरावांचा त्यात समावेश आहे.
परिषदेला परिसरातील शेतकरी व शेतमजुर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारची पहिलीच पाणी परिषद या परिसरात झाली. ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा अशी परिषद घेण्याचा निर्धार झाला.

Web Title: Six council resolutions on the eastern region's water conventions are approved for the Kisan Sabha water council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.