जिल्ह्यातील सहाजण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 12:30 PM2020-07-03T12:30:59+5:302020-07-03T12:31:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे स्वॅबचे रिपोर्ट येत नाही, नवीन स्वॅब घेतले जात नाही. मात्र दुसरीकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे स्वॅबचे रिपोर्ट येत नाही, नवीन स्वॅब घेतले जात नाही. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गुरुवारी पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकुण कोरोनामुक्तांची संख्या ८० झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे स्वॅब घेवून पाच ते सहा जण दिवस उलटले आहेत. त्यांचे रिपोर्ट येत नाहीत. नवीन स्वॅब घेतले जात नाहीत अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी काहीजण कोरोनामुक्त होत आहेत.
गुरुवारी सहाजण कोरोनामुक्त झाले. त्यांचे स्वॅब रिपोर्ट आले किंवा कसे याबाबत मात्र माहिती दिली गेली नाही. केवळ त्यांच्यात आता कुठलेही लक्षणे नसल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांमध्ये नंदुरबारातील कोकणीहिल येथील एक, सिंधी कॉलनीतील दोन, परळनगरातील एक, शहादा येथील गणेश नगरातील व तळोदा येथील आमलाड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आता कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एकुण ८० जणांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात आता ७४ जण उपचार घेत आहेत. एकुण आठ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जणांचे अहवाल येण्याचे बाकी आहेत. तर १,७१९ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सुरुवातीला ६० टक्केपर्यंत होते आता ते ५० टक्केच्या आत आले आहे. गुरुवारचे सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त होणाºयांचे प्रमाण सरासरी ४९ टक्केपर्यंत आहे. गेल्या चार दिवसांपासून स्वॅब रिपोर्टच येत नसल्यामुळे रुग्ण संख्येचा आकडा स्थिर आहे. त्यामुळे ही आकडेवारी आणखी कमी जास्त होऊ शकते.