पोलिसाला मारहाणप्रकरणी एकास सहा महिने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:39 PM2017-08-26T12:39:20+5:302017-08-26T12:39:20+5:30
नवापूर : 2013 मध्ये घडली होती घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : पोलीस कर्मचा:यास मारहाणप्रकरणी एकास सहा महिन्याची शिक्षा नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावली.
याबाबत हकीकत अशी, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी किशोर वळवी हे 2013 मध्ये तत्कालीन आमदार शरद गावीत यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. 1 डिसेंबर 2013 रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा पषिद व पंचायत समिती निवडणूक मतदान असल्याने आमदार शरद गावीत यांचेसोबत अंगरक्षक म्हणून किशोर वळवी होते. नगारे गावातून वडदा गावाकडे जात असतांना धिरसिंग ईस:या नाईक यांनी रस्त्याच्या मध्यभागी मोटरसायकल उभी केली होती. ती बाजुला घेण्यास सांगितल्याचा राग येवून धिरसिंग नाईक यांनी हवालदार किशोर वळवी यांना तोंडावर वीट फेकून मारली होती. त्यात ते जखमी झाले होते. याबाबत वळवी यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नवापूर प्रथमवर्ग न्यायालयात हा खटला चालला. न्या.एन.आर.येलमाने यांनी दोन्ही बाजू तपासल्यावर धिरसिंग नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. सरकारपक्षातर्फे विद्या देवरे यांनी काम पाहिले.