खून प्रकरणी सहा जणांना सश्रम कारावास : शहादा न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:32 PM2018-07-24T13:32:12+5:302018-07-24T13:32:19+5:30
काका-काकूसह चुलत भावांचा समावेश
नंदुरबार : सालदाराशी भांडण करणा:या चुलत भावास समजविण्याच्या प्रय} केल्याच्या राग येवून चार भावडांसह काका-काकूंनी मारहाण करून जागीच ठार केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच तर दोन आरोपींना तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली.
कुढावद, ता.शहादा येथील भिमसिंग भिका चौधरी (वडार) यांच्या शेतातील सालदार लक्ष्मण भिल यास चुलत भाऊ महादू धर्मा चौधरी हे 3 डिसेंबर 2014 रोजी शिविगाळ करून भांडण करीत होता. त्याबाबत अजरून भिका चौधरी हा सांगण्यास गेला असता त्याचा राग महादू चौधरी यास आला. त्या वादातून महादू चौधरीसह प्रकाश धर्मा चौधरी, किसन धर्मा चौधरी, बापू धर्मा चौधरी, धर्मा काशिराम चौधरी, शांताबाई धर्मा चौधरी सर्व रा.कुढावद यांनी अजरून चौधरी यांना बेदम मारहाण करून ठार मारले.
या प्रकरणी भिमसिंग चौधरी यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सहाही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याचे कामकाज शहादा अतिरिक्त न्यायालयात न्या.पी.बी.नायकवाड यांच्यासमोर चालले. न्यायालयाने सर्व साक्षी, पुरावे गृहीत धरून खून प्रकरणी महादू चौधरी, प्रकाश चौधरी, किसन चौधरी व बापू चौधरी यांना पाच वर्ष व तीन हजार रुपये दंड तर धर्मा चौधरी व शांताबाई चौधरी यांना तीन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम 143 अन्वये सहा महिने कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पोलीस निरिक्षक सुनील खरे यांनी आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस जमादार नासीरखॉ पठाण व हवालदार प्रमोद पाटील होते.