शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी सहा प्रकल्प अधिकारी अटकेत
By Admin | Published: January 19, 2017 07:13 PM2017-01-19T19:13:45+5:302017-01-19T19:13:45+5:30
शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील सेवानिवृत्त सहायक प्रकल्प अधिकारी मगन साकऱ्या वळवी यांना अटक
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 19 - शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील सेवानिवृत्त सहायक प्रकल्प अधिकारी मगन साकऱ्या वळवी यांना अटक करण्यात आली आहे. एकुण १२ संशयीतांपैकी एकूण नऊ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विद्यार्थी शिष्यवृत्तीचा आठ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला होता. प्रकल्प कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह एकुण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली असून सेवानिवृत्त सहायक प्रकल्प अधिकारी मगन पाडवी यांना तळोदा येथील त्यांच्या निवासस्थातून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. अटकेतील एकुण संशयीतांची संख्या आता नऊ झाली असून तीनजण अद्यापही फरार आहेत. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (वार्ताहर)