कजर्मुक्तीपासून सहा हजार वंचित शेतक:यांना पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:24 PM2018-03-10T12:24:53+5:302018-03-10T12:24:53+5:30

Six thousand disadvantaged farmers from debt relief: Again, | कजर्मुक्तीपासून सहा हजार वंचित शेतक:यांना पुन्हा संधी

कजर्मुक्तीपासून सहा हजार वंचित शेतक:यांना पुन्हा संधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कजर्मुक्तीसाठी पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळू न शकलेल्या शेतक:यांसाठी पुन्हा 31 मार्च अखेर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास सहा हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, याआधी 14 हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळाला आहे.
याबाबत जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पुरी यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतक:यांना वैयक्तिक व तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नव्हते. या पाश्र्वभुमिवर यापूर्वीच्या विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचीत राहिलेल्या शेतक:यांसाठी पुन्हा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
31 मार्च अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. शिवाय यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतक:यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील किंवा शेतक:यांना (ँ33स्र2://ू2े228.ेंँंल्ल’्रल्ली.ॅ5.्रल्ल) या पोर्टलवर स्वत: नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज करता येतील. शेतक:यांसाठी स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती   भरून ऑनलाईन अर्ज भरण्याची     सेवा नि:शुल्क असल्याचेही        जिल्हा उपनिबंधक पूरी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याबाबत पाहिजे तशी जनजागृती होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यावेळी देखील वंचीत राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता जास्तीत जास्त शेतक:यांर्पयत ही योजना व त्याचे लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.
याशिवाय काही महाईसेवा केंद्रांमध्ये अशा प्रकारचे अर्ज भरून घेण्यासंदर्भात काहीही सुचना नसल्याचे शेतक:यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे देखील शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. 
ही बाब लक्षात घेता   त्यादृष्टीनेही प्रशासनाने जिल्ह्यातील महाईसेवा केंद्रांना सुचीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत   आहे. जिल्हा बँकेकडून व इतर बँकांकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दीड   लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, असा शेतकरी  कुटुंबांनी राज्य शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत 31 मार्च 2018 र्पयत संबंधित बँकेत रकमेचा भरणा करून छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे  आवाहन करण्यात आले आहे. जे शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत ते पुढीलवर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े याआधी पात्र 14 हजार  शेतक:यांना 45 कोटी 36 लाख 40 हजार 699 रुपयाचा कजर्माफीचा लाभ मिळाला.

Web Title: Six thousand disadvantaged farmers from debt relief: Again,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.