इतना सन्नाटा क्यू है भाई..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:09 PM2017-10-03T17:09:40+5:302017-10-03T17:10:56+5:30

शासकीय पॉलिटेकीक : ईएनटीसी विद्याशाखेची व्यथा, विद्याशाखा बदलाचा प्रस्ताव

So sanaata que bhai .. | इतना सन्नाटा क्यू है भाई..

इतना सन्नाटा क्यू है भाई..

Next
ठळक मुद्देसिव्हील शाखेची मागणी नंदुरबार येथील शासकीय पॉलिटेकAीक महाविद्यालयात संगणक, विद्युत, यंत्र व अणुविद्युत आदी अभियांत्रिकीच्या शाखा आहेत़ त्यापैकी अणुविद्युत म्हणजे ईएनटीसी वगळता सर्व शाखांमध्ये समाधानकारक विद्यार्थी संख्या आह़े या ठिकाणी नागरी अभियांत्रिकी नाशिक येथील तंत्रशिक्षण संचलनालयाकडे विद्याशाखा बदलाबाबत प्रस्ताव पाठविला आह़े तसेच नंदुरबार येथील शासकीय पॉलिटेकAीक महाविद्यालयात सिव्हील ब्रांचला मान्यता द्यावी अशीही मागणी प्रस्तावात करण्यात आली आह़े दुर्गम भाग तसेच रोजगाराच्या संधी कमी असल्याने विद्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार येथील शासकीय  पॉलिटेकAीक महाविद्यालयात अणुविद्युत अभियांत्रिकी म्हणजेच ईएनटीसी शाखेला बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी संख्या आह़े त्यामुळे या विद्याशाखेत ‘इतना सन्नाटा क्यू है भाई.’ अशी म्हणण्याची वेळ आली आह़े विद्यार्थी संख्या कमी असल्याने या सर्व विद्याथ्र्याची विद्याशाखा बदल करायला मान्यता मिळावी असा प्रस्ताव येथील पॉलिटेकAीकतर्फे  सहसंचालक तंत्रशिक्षण संचलनालय नाशिक यांना पाठविण्यात आला आह़े 
शैक्षणिक वर्ष 2017-2018 मध्ये एकूण 60 विद्यार्थी क्षमता असताना ईएनटीसी शाखेत प्रथम वर्षात केवळ चार विद्यार्थी प्रवेशित आहेत़ त्यामुळे उर्वरीत 54 जागा या रिक्त आहेत़ तसेच व्दितीय व तृतीय वर्षात अनुक्रमे सात व बारा विद्यार्थी प्रवेशित आहेत़ त्यामुळे येत्या काही वर्षामध्ये ही विद्याशाखा नंदुरबार येथून हद्दपार होते की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े संगणक, विद्युत, यंत्र या अभियांत्रिकी शाखेत ब:यापैकी विद्यार्थी संख्या असली तरी अद्यापही एकही विद्याशाखेने 60 जागांपर्यतची मजल गाठलेली नाही़ त्यामुळे येथील शासकीय पॉलिटेकAीक महाविद्यालयाला दरवर्षी विद्याथ्र्याच्या प्रवेशासाठी जुळवा-जुळव करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े 
मंदावत जात असलेल्या टेलीकम्युनिकेशची वाढ तसेच ईएनटीसी क्षेत्रात कमी होत असलेला रोजगार यामुळे विद्याथ्र्याचा या शाखेकडे ओढा कमी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े त्या तुलनेत संगणक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी तसेच विद्युत अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या भरपुर संधी उपलब्ध असल्याने विद्याथ्र्याचा याच शाखांकडे विशेष पसंती असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे ईएनटीसी विद्याशाखेत विद्यार्थी मिळत नसल्याने या शाखेत विद्याथ्र्याची दरवर्षीच वाणवा असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आह़े
दरम्यान, ईएनटीसी शाखेत विद्याथ्र्याची दिवसेंदिवस घटती संख्या लक्षात घेत महाविद्यालकडून या विद्याथ्र्याच्या विद्याशाखा बदलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला                  आह़े 
काही दिवसांपूर्वी नाशिक येथील तंत्रशिक्षण संचालनालयात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा प्रस्ताव सहसंचालक यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती आह़े विद्याथ्र्याच्या विद्याशाखा बदलाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास भविष्यात ही विद्याशाखा अस्तित्वात असेल की नाही याबाबत मात्र अनेक शंका निर्माण होत आह़े 
विद्याथ्र्याचे नुकसान न होता मध्यम मार्ग काढण्याची अपेक्षा
विद्याथ्र्याच्या पुरेशा संख्येअभावी विद्याशाखा बदलाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असला तरी याचा विपरित परिणाम विद्याथ्र्याच्या शैक्षणिक जीवनावर होऊ नये अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात आली आह़े एखाद्या विद्याथ्र्याला मुळात ईएनटीसी शाखेत शिकण्याची व यातच आपले भवितव्य घडविण्याची इच्छा असेल परंतु       सोबत इतर विद्यार्थी नसल्याने सक्तीच्या विद्याशाखा बदलामुळे  त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावरही उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आह़े
शासकीय अभियांत्रिकीसाठी विद्याथ्र्याना मोठय़ा परिश्रमानंतर प्रवेश मिळत असतो़ इतर खाजगी महाविद्यालयात घेण्यात येणारी भलीमोठी प्रवेश फी, डोनेशन, वर्षभर घेण्यात येत असलेली प्रॅक्टीकल फी आदींमुळे तेथे शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो़ त्यामुळे राज्यात ेकोठेही प्रवेश मिळत असल्यास विद्याथ्र्याची जाण्याची तयारी असतेच़ परंतु अशा प्रकारे कमी विद्यार्थी संख्येचा परिणाम इतर विद्याथ्र्यावर पडत असल्यास याबाबत शासनाने मार्ग काढण्याची अपेक्षा आता विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
 

Web Title: So sanaata que bhai ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.