मुले पळविण्याच्या अफवांना पायबंदसाठी समाज घटकांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:05 PM2018-06-30T13:05:19+5:302018-06-30T13:05:33+5:30

Social elements should take the initiative to curb the rumors of children | मुले पळविण्याच्या अफवांना पायबंदसाठी समाज घटकांनी पुढाकार घ्यावा

मुले पळविण्याच्या अफवांना पायबंदसाठी समाज घटकांनी पुढाकार घ्यावा

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून अनेक गावांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून अनेक निदरेष लोकांना मारही खावा लागला आह़े या घटना थांबता थांबेना अशी अवस्था झाल्याने आता या अफवा रोखणार कोण असाच प्रश्न निर्माण झाला आह़े 
मुले पळवून नेणारी टोळी परिसरात फिरत असून त्यापासून नागरिकांनी सावध रहावे असा मेसेज सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांसून व्हायरल झाला आह़े ही चर्चा सुरू असतानाच मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नागरिकांनी रात्रीची गस्त गावागावात सुरू केल्याची बातमी आली, नव्हे तर संशयावरून दोन जणांना ठार मारल्याची घटनाही घडली़ या वृत्ताची चर्चा होत असतानाच नंदुरबार शहरात रेल्वेस्थानकावर बालकाला उचलून पळ काढला होता़ त्यातून चर्चेला बळ मिळाले त्यापाठोपाठ शहरातील सिंधी कॉलनीतही अशीच घडली़ त्यानंतर गुजरातच्या सिमेवर नवापूर तालुक्यात गडद येथे अफवेतूनच दोन जणांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली़ नंदुरबार शहरात पुन्हा एका शिक्षिकेलाच या अफवेचा बळी ठरवण्यात आल़े त्यानंतर म्हसावद ता़ शहादा येथील घटनेनेतर सर्वानाच आवक केल़े याठिकाणी चारचाकी वाहनावर लोकांनी संताप काढला़ त्यातील तिघांना रक्तबंबाळ केल़े आणि गाडीच पेटवून दिली़ या घटनेचे वृत्त गावोगावी चचर्िेले जात नाही तोच घोटाणे ता़ नंदुरबार येथे पुन्हा अशाच अफवेतून चक्क साधूंनाच पकडून बेदम मारल़े ब्राrाणपुरी ता़ शहादा येथे एका बहुरूप्याला चोप देण्यात आला़ अशा गावोगावी घटना घडत असल्याने अफवेचे लोण किती खोलवर रूजले असल्याची प्रचिती येत आह़े 
विशेष म्हणजे एवढय़ा सा:या घटना घडत असताना राजकारणी, प्रशासन, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी अजूनही हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही़ अफवा थांबवून गावोगावी जनजागृतीबाबत ठोस प्रयत्न सुरू झालेले नाहीत़ पोलीस प्रशासनाच्या गावोगावी घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यातच दमछाक होत आह़े त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र आह़े प्रत्येक गावात, चौकाचौकात, टोळ्याटोळ्याने बसलेल्या नागरिकांमध्ये फक्त मुले पळवून नेणा:या टोळीचीच आणि घडणा:या घटनांचीच चर्चा आह़े यातील बहुतांश जण या अफवा असल्याचे मान्य करतात़ पण गावात अशी अफवा आली की, सारेच त्यामागे पळतात़ आणि कायदा हातात घेऊन संशयितांवर तुटून पडतात़ 
एकूणच या अफवांमुळे सर्वानाच हकनाक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे आता गावोगावी जागरूक नागरिकांनी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आह़े अशी अफवा जर कोणी पसरवत असेल तर त्याचाही स्थानिक स्तरावरच बंदोबस्त करावा़ 
गावागावात अनेक अनोळखी व्यक्ती या-ना त्या निमित्ताने फिरत असून त्यामुळे यापूर्वी चोरीच्या व फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत़ अशा घटनाही या अफवेला बळ देणा:या ठरल्या असल्या तरी नागरिकांनी थेट कायदा हातात न घेता एखाद्यावर संशय आल्यास त्याची विचारपूस करावी व त्यातून काही संशयित माहिती मिळाल्यास पोलीसांशी संपर्क करावा़ पण शांतता टिकवण्यासाठी मात्र सर्वानीच प्रयत्न करणे आवश्यक आह़े  
लोकांनी व्हायरल झालेल्या व्हॉटस व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये, अनोळखी इसमांना मारहाण करून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, संशय असल्यास पोलीसांना माहिती द्यावी़ वाढीस लागलेले हे प्रकार थांबवण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस पाटील आणि कोतवाल यांना दवंडी देऊन जनजागृती करण्याचे सूचित केले आह़े पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आह़े असल्याचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. एखाद्या घटनेबाबत वारंवार चर्चा व अफवा सुरू झाल्यास त्याबाबत एक समाजमन तयार होत़े आणि त्यामुळे अफवांच्या चर्चेलाही महत्त्व प्राप्त होत़े व लोक तशी कृती करू लागतात़ तशातलाच हा प्रकार आह़े मुले पळवून नेणा:या टोळीबाबत मोठय़ा प्रमाणावर चर्चा झाल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आह़े ही भिती दूर करण्यासाठी आता व्यापक जनजागृतीची आवश्यकता आह़े त्यासाठी गावोगावी लोकांमध्ये जाऊन लोकांच्या मनात असलेली भिती दूर करणे गरजेचे असल्याचे मानसशास्त्रज्ञ प्रा़ राजेश मेश्राम यांनी सांगितले.

Web Title: Social elements should take the initiative to curb the rumors of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.