केळीच्या खांबांसोबत जळाली सामाजिक वनीकरणाची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:01 PM2018-04-25T13:01:48+5:302018-04-25T13:01:48+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी ते करणखेडा रस्त्या दरम्यान असलेल्या धिरजगाव फाटय़ाजवळ अज्ञातांकडून केळीचे खांब जाळण्यात आले आह़े परंतु या खांबासोबत सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आलेली झाडेही जळून खाक झाली असल्याची भिषण घटना समोर आली आह़े
या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आह़े सध्या केळीचा हंगाम जोरात सुरु आह़े केळी काढल्यानंतर उर्वरीत केळीच्या खांबांची शेतक:यांकडून विल्हेवाट लावण्यात येत असत़े काही वेळा ऊस उत्पादक शेतक:यांकडून या केळीच्या खांबांना इतरत्र फेकूण देण्यात येत असत़े तर काहींकडून एखादी निजर्न ठिकाणी नेत खांब जाळून टाकण्यात येत असतात़ या ठिकाणीही मोकळ्या जागेत खांबांची जाळून विल्हेवाट लावण्यात आली आह़े परंतु लगतच इतरही वृक्ष असल्याने यामुळे तेदेखील जळून खाक झाले आहेत़ त्यामुळे संबंधित प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आह़े या ठिकाणी केळीचे खांब जाळण्यासाठी आणण्यात आले होत़े परंतु रस्त्यालगत लावण्यात आलेल्या वृक्षांजवळच हे खांब जाळल्याने तसेच उन्हामुळे या आगीने अधिकच पेट घेतल्याने साधारणात 20 ते 25 झाडांचे खोड या आगीत जळाले आह़े त्यामुळे पुढील काळात हे झाडे टिकाव धरु शकतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आह़े अशाच घटना इतरही ठिकाणी होण्याची शक्यता असल्याने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आह़े