सोनापाटी ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव
By admin | Published: March 29, 2017 11:52 PM2017-03-29T23:52:00+5:302017-03-29T23:52:00+5:30
मद्य विक्रीवर बंदी : दोन गावांमध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प
अक्कलकुवा : तालुक्यात सोनापाटी ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया खडकुवा आणि सोनापाटी या दोन गावांमध्ये दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे़ सोनापाटी ग्रामपंचायतीने हा ठराव करून गावात अवैध मद्यविक्री बंद करण्याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिले़
दोन्ही गावे व्यसनमुक्त करून तंटामुक्त गावनिर्मितीचा संकल्प करत दोन्ही गावातील, युवक, ज्येष्ठ राजकीय पदाधिकारी यांच्या पुढाकाराने दारूबंदीचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे़ पोलीस निरीक्षक कटके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ग्रुपग्रामपंचायत सोनापाटी अंतर्गत येणाºया खडकुवा आणि सोनापाटी या दोन गावांमध्ये जानेवारी महिन्यांपासून दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला आहे़ या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे़ पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला प्रतिसाद देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ दारूबंदीचा हा ठराव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनात झाला होता़
निवेदन दिल्यानंतर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तापसिंग वसावे, सरपंच कुवरसिंग पाडवी, उपसरपंच संपत तडवी, पोलीस पाटील, ईश्वर तडवी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश तडवी, कुशल तडवी, नरपतसिंग पाडवी, चंद्रसिंग पाडवी, विक्रमसिंग पाडवी, दिलवरसिंग पाडवी, विरसिंग पाडवी, कथ्थू पाडवी यांच्यासह सोनापाटी ग्रामस्थांनी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली़ (वार्ताहर)
युवकांना दिले व्यसनमुक्तीचे धडे
ग्रामपंचायतीत झालेल्या ठरावासाठी महिला व दोन्ही गावातील ज्येष्ठांनी प्रयत्न केले होते़ या ठरावानुसार गावात अवैधरीतीने विक्री होणाºया दारूवर पूर्णपणे बंदी करण्याची मागणी करण्यात आली होती़ या ठरावानंतर तीन महिन्यांपासून दोन्ही गावात ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून युवकांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करून त्यांना रोजगाराभिमुख देण्यावर भर देण्यात आला़
दोन्ही गावात झालेल्या दारूबंदीचे ठराव जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी दिली आहे़