फोन करताच, रुग्णवाहिका होईल हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:01 PM2018-12-03T13:01:00+5:302018-12-03T13:01:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : फोन करताच अवघ्या पाच ते दहा मिनिटात रुग्णवाहिका आश्रम शाळेत दाखल होईल. शक्य झाल्यास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : फोन करताच अवघ्या पाच ते दहा मिनिटात रुग्णवाहिका आश्रम शाळेत दाखल होईल. शक्य झाल्यास स्थानिक ठिकाणीच प्राथमिक उपचार होईल, त्यानंतर जवळच्या उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात विद्याथ्र्याला दाखल केले जाईल. हे शक्य होणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य वाहिनी, आदिवासी जीवन दायीनी योजनेअंतर्गत मिळालेल्या 11 अत्याधुनिक रुग्णवाहिकांमुळे. त्यांचे लोकार्पण रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार व तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालविण्यात येणा:या 74 आश्रम शाळांमधील 30 विद्याथ्र्यासाठी ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी वान्मती सी., विनय गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले, आश्रमशाळेत शिकणा:या विद्याथ्र्याना आता मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. विद्याथ्र्यानीही त्याचा सदुपयोग करावा. यात असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा उपयोग विद्याथ्र्याना पुरेपूर होईल यासाठी आदिवासी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी आणि नियुक्त केलेल्या कर्मचा:यांनी प्रय}शील राहावे. जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मोडत असल्यामुळे केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रय} राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या अर्थसहाय्य योजनेतून 11 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा आरोग्याचा प्रश्न सुटू शकणार आहे. जिल्ह्यातील 74 आश्रम शाळांच्या जवळ बीएसएनएल कडून 74 टॉवर केंद्र शासनाकडून मंजूर करून घेतले आहेत. यामुळे दुर्गम भागातील विद्याथ्र्यानाही आता इंटरनेट व मोबाईल वापराची चांगली संधी मिळणार आहे. त्याचा उपयोग जास्तीत जास्त शैक्षणिक उपक्रमांसाठी करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात आदिवासी इंग्रजी शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये उत्कृष्ट काम करणा:या प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच शिक्षण व क्रिडा क्षेत्रात चांगले काम करणा:या विद्याथ्र्यांचा प्रमाणपत्र देवून जयकुमार रावल, डॉ.हिना गावीत, रजनी नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक विनय गौडा यांनी केले. आभार वान्मती सी. यांनी मानले. प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे, औषधी साठा आणि डॉक्टर व परिचर या रुग्णवाहिकेत 24 तास उपलब्ध राहतील. 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास लागलीच रुग्णवाहिका संबधीत ठिकाणी पोहचणार आहे.
सर्वच रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली राहणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका कुठे आहे. कुठे गेली याची माहिती सव्र्हरला मिळणार आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा दुरूपयोग होण्याचे टळणार आहे.