बीएड् प्रवेशासाठी लवकरच तिसरी फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:39 PM2018-09-26T12:39:52+5:302018-09-26T12:41:40+5:30
विद्याथ्र्याची लगबग : ऑपशन फॉम एडिट करण्यासाठी दिली होती मुदत
नंदुरबार : बीएड् प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला भरलेल्या ऑपशन फॉर्म एडिट करण्याची मुदत संपली असून आता विद्याथ्र्याकडून तिस:या प्रवेश फेरीची तयारी करण्यात येत आह़े साधारणत अडीच महिन्याआधी बीएड प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑपशन फॉर्म भरण्यात आले होत़े
जिल्ह्यासह सर्वत्र बीएड् प्रवेश प्रक्रिया सुरु असून अद्याप दोन प्रवेश फे:या पूर्ण झालेल्या आहेत़ साधारणत: 6 ऑक्टोबरला तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आह़े अडीच महिन्यांपूर्वी बीएड् प्रवेशासाठी विद्याथ्र्याकडून ऑपशन फॉर्म भरुन घेण्यात आला होता़
यात, विद्याथ्र्याला पाहिजे असलेले बीएड् कॉलेज, दुस:या व तिस:या क्रमांकाच्या पर्यायी महाविद्यालयाचे नाव, शैक्षणिक माहिती आदींचा समावेश होता़ परंतु विद्याथ्र्याच्या सोयीनुसार प्रवेश घेऊ इच्छिना:या महाविद्यालयांचा आद्यक्रम बदलत असतो़ त्यामुळे संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी भरण्यात आलेला अर्ज पुन्हा एडिट करण्याची सुविधा शिक्षण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती़ त्यानुसार 21 ते 25 सप्टेंबर्पयत ऑपशन फॉर्म एडिट करण्याची मुदत देण्यात आलेली होती़ त्यामुळे विद्याथ्र्याकडून सायबर कॅफे आदींवर गर्दी करण्यात येत आह़े
जागा शिल्लक असल्याने चौथ्या प्रवेश फेरीची शक्यता कमीच
नंदुरबारसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील ग्रॅन्टेड् तसेच नॉन ग्रँटेड् महाविद्यालयांमध्ये बीएड्च्या जागा रिक्त असल्याने तिस:या प्रवेश फेरीमध्येच बहुतेक विद्याथ्र्याचा प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आह़े त्यामुळे साहजिकच चौथी प्रवेश फेरी होण्याची शक्यता कमी असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
संपूर्ण जिल्ह्यात साधारणत 20 शिक्षणशास्त्र महाविद्यालये आहेत़ त्यातील एनटीव्हीएस शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय, देवमोगरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथील पुज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळ शिक्षणशास्त्र महाविद्यालय एस़एच़ नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आदींमध्ये विद्याथ्र्याचा जास्त ओढा असल्याची माहिती देण्यात आली आह़े
पुढील वर्षापासून बीएड्चा कालावधी वाढण्याची चर्चा सर्वत्र सुरु झालेली आह़े काही वर्षापूर्वी केवळ 9 महिन्यांचा बीएड्चा अभ्यासक्रम करण्यात आला होता़ त्यानंतर पुन्हा अभ्यासक्रमात वाढ होऊ त्याचा कालावधी 2 वर्षाचा करण्यात आला आह़ेबीएड्ची तिसरी प्रवेश फेरी साधारणत: 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याने त्यासाठी विद्याथ्र्याकडून जात वैधता प्रमाणपत्र दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी विविध दाखल्यांची जुळवाजुळव करावी लागत आह़े ऑपशन फॉर्म एडिट करण्यासाठी 25 सप्टेंबर ही शेवटची मुदत होती़ त्यामुळे विद्याथ्र्याकडून सायबर कॅफे तसेच महाविद्यालयात गर्दी करण्यात आली होती़ त्याच प्रकारे ओबीसी, एससी, एसटी आदी विविध कोटय़ातून प्रवेश मिळणार असल्याने साहजिकच त्या-त्या प्रशासकीय यंत्रणेकडून जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही धडपड करण्यात येत आह़ेजिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याना त्यांच्या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आह़े नंदुरबार येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्याथ्र्याची मोठी गर्दी करण्यात येत असत़े परंतु प्रशासनाचे ढिसाळ नियोजन असल्याने विद्याथ्र्याची गैरसोय होत आह़े
त्या तुलनेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण विभागाकडून एससी, ओबीसी आदी संवर्गातील विद्याथ्र्याना लागलीच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने विद्याथ्र्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े