अवकाळी पावसामुळे ज्वारीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:26 AM2021-01-09T04:26:12+5:302021-01-09T04:26:12+5:30

अडीच हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. पीकही परिपक्व झाले होते; परंतु गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण पीक ...

Sorghum damage due to unseasonal rains | अवकाळी पावसामुळे ज्वारीचे नुकसान

अवकाळी पावसामुळे ज्वारीचे नुकसान

Next

अडीच हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. पीकही परिपक्व झाले होते; परंतु गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण पीक भुईसपाट झाले. त्यामुळे उरल्यासुराल्या रब्बीच्या आशाही मावळल्या आहेत. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी. - नानासिंग वसावे, शेतकरी, नर्मदानगर, ता.तळोदा.

एक हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा केला होता. त्याचावरच आशा होती. तथापि, अवकाळीने तोही हिरावून घेतला. आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. निदान शासनाने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा आहे. -दोहऱ्या वसावे, शेतकरी, सरदारनगर, ता.तळोदा

गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नर्मदानगर व वाल्हेरी परिसरात रब्बी ज्वारीचे नुकसान झाले असून, तलाठी व कृषी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन पंचनामे करण्यास पाठविले आहे.

- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, तळोदा

Web Title: Sorghum damage due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.