शेतक:यांसाठी ‘उकीरडे’ ठरताहेत उत्पन्नाचा स्त्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:48 PM2019-05-27T12:48:33+5:302019-05-27T12:48:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनले आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीच्या गावांमध्ये वर्षभर तयार होणा:या या शेणखताची खरेदी करण्यासाठी खान्देशातून मोठे शेतकरी गर्दी करत असून यातून शेतक:यांना अर्थप्राप्तीचा नवा मार्गही सापडला आह़े
अक्कलकुवा तालुक्यात सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीवरील गावांमध्ये सर्वच शेतक:यांकडे पाळीव गुरे आहेत़ काही जणांनी दुग्धव्यवसाय म्हणून तर काहींनी शेतीसाठी उपयोगी म्हणून गुरांचे संगोपन केले आह़े यातून घरोघरी किमान चारपेक्षा अधिक गुरे हमखास दिसून येतात़ भल्या पहाटे उठून गुरांचे शेण काढून ते उकीरडय़ावर टाकत शेतकरी त्यांचा साठा करतात़ वर्षभर होणा:या ढिगाला गेल्या दोन वर्षापासून मोठी मागणी आह़े सेंद्रीय शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या शेणखताच्या खरेदीसाठी जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी वाहनांसह येथे भेटी देत आह़े शेतक:यांसोबत वार्षिक करार करुन वाहनाच्या हिशोबाने खत भरुन घेत तातडीने पैसेही देत आहेत़ यातून दुष्काळातही शेतक:यांना आधार मिळाला असून सपाटीच्या गावांमध्ये शेणखताच्या उद्योगाचा फायदा मजूरांनाही होत असून त्यांनाही खत वाहून नेण्याचा रोजगार उपलब्ध झाला आह़े तालुक्यातून दरदिवशी 15 वाहने परजिल्ह्यात जात आहेत़ शेतक:यांकडून बांबूचे मोठे टोपले शेणखत मोजणीसाठी वापरले जात आह़े सपाटीच्या गावांमध्ये 110 ते 130 रुपये टोपले यादराने शेणखताची विक्री होत आह़े बहुतांश शेणखत हे कोरडेच खरेदी करण्याकडे मोठे शेतकरी भर देतात़ सहा चाकीट्रक साधारण 75 टोपले खत टाकल्यास ते पूर्णपणे क्षमतेने भरत़े यातून शेतक:याला आठ हजार 500 रुपये सहज मिळतात़ खत भरणे आणि वाहतूकीची जबाबदारी ही संबधित खरेदीदाराची असत़े शेतक:यांना 15 गुरांच्या मागे आठवडय़ात 50 त 60 टोपले शेणखत मिळत असल्याने त्यांच्याकडून जागा उपलब्ध असल्यास छोटे ढिग करुन उन्हात सुकवण्यासाठी टाकले जात़े एका एकराना साधारण 50 टोपले शेणखत लागत असल्याने बहुतांश शेतकरी वेळावेळी येथे भेट देत बुकींग करुन ठेवतात़ यातून येथील शेतक:यांना महिन्याकाठी 10 हजार मिळू लागले आहेत़ बहुतांश शेतकरी एकापेक्षा अधिक ठिकाणी शेणखताचा साठा करत आहेत़ पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यास इतर आठ महिने त्याला सुकवून वेळावेळी त्याची विक्री करता येणे शक्य होत़े माती आणि काडीकचरा एकत्र झाल्यास शेतकरीच खरेदीदाराला टोपल्यामागे 20 रुपयांर्पयतची सूट देतात़ परंतू मातीतच हे खत टाकले जाणार असल्याने खरेदीदार शेतकरी 20 रुपयांर्पयतची सूट नाकारतात़ सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जनवारांना दरदिवशी 8 ते 12 किलो चारा सहज मिळत असल्याने त्यांचे शेणखत हे सेंद्रीय खत म्हणून चांगले मानले जात़े