उपद्रवी लोकांवर तात्काळ कारवाईसाठी खास यंत्रणा शांतता समिती बैठक : पोलीस अधीक्षकांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:38 PM2017-08-26T12:38:14+5:302017-08-26T12:38:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गणेशोत्सव व बकरी-ईदच्या पाश्र्वभुमिवर पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. सामान्य लोकांना त्रास होईल असे गैरकृत्य करणा:यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिला.
शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व पोलीस अधीक्षक संजय पाटील उपस्थित होते. संजय पाटील यांनी सांगितले, शहरासह जिल्ह्यातील सर्व संवेदनशील भागातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे संशयीतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रात्री आणि दिवसा देखील पोलिसांची गस्त कायम राहणार आहे. पेट्रोलिंग वाहनांवर देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उपद्रवी लोकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात सर्वच पोलीस ठाण्यांना सुचीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याबाबत आवाहन केले. गुलालाचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे निरीक्षक किशोर सोन्याबापू नवले, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक सुभाष भोये यांच्यासह इतर अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.