विशेष ग्रामसभेत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:31 AM2017-10-04T11:31:53+5:302017-10-04T11:31:53+5:30
घरकुलांच्या प्रश्नावर वाद : दोन गटांची परस्परविरोधी फिर्याद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील दोंदवाडे येथे महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेदरम्यान घरकुलाचा प्रश्न केल्याने झालेल्या वादानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ यात चौघे जखमी झाले असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिली आह़े
दोन ऑक्टोबर रोजी दोंदवाडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा सुरू झाल्यानंतर सचिन अमृत पाटील याने लाभार्थीचे घरकुल मंजूर झाल्यानंतरही ज्ञानेश्वर हिंमत पाटील हे मंजूर घरकुलांचे फोटो काढू देत नसल्याची तक्रार ग्रामसेवकाकडे केली़ यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह वैैशालीबाई ज्ञानेश्वर पाटील, मालूबाई हिंमत पाटील, संतोष खंडू मराठे, दिलीप खंडू मराठे, ओंकार खंडू मराठे, मधुकर नामदेव मराठे, निलेश युवराज मराठे, हेमराज रविंद्र मराठे, युवराज नामदेव मराठे, राकेश मोहन पाटील, हिंमत सदाशिव पाटील, दिपक निंबा मराठे, हरीष रमेश पाटील, विनोद निंबा पाटील, विनोद भिमराव पाटील, रविंद्र बाबुराव पाटील सर्व रा़ दोंदवाडे यांनी सचिन पाटील व गोविंदसिंग खुमानसिंग गिरासे या दोघांना बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी देत शिविगाळ केली़, अशी फिर्याद सचिन पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिली असून सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल आह़े
दुस:या फिर्यादीत ज्ञानेश्वर हिंमत पाटील यांनी म्हटले आहे की, सचिन पाटील, मंगेश पद्मसिंग गिरासे, गोविंद गिरासे, रविंद्र गिरासे, अशोक रामदास पाटील या पाच जणांनी सकाळी 11 वाजता ग्रामसभा सुरू झाल्यानंतर लोकांची कामे केली नाहीत, घरकुल मंजूर केली नाहीत, असा आरोप करत वाद घातला़ यावेळी संशयितांनी वैैशाली पाटील व ज्ञानेश्वर पाटील या दोघांनाही बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय बागले करत आहेत़