तळोदा पालिकेत स्थायी व विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:26 AM2021-01-09T04:26:30+5:302021-01-09T04:26:30+5:30
तळोदा नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीपदाची १० जानेवारी रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन समित्या गठित करून ...
तळोदा नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीपदाची १० जानेवारी रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे नवीन समित्या गठित करून सभापतीपदासाठी निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी १३ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात १० जानेवारी रोजी विशेष सभा घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तळोदा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची ही विशेष सभा पार पडणार आहे.
विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणुकीचे विविध नमुन्यातील नामनिर्देशनपत्रे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे सभेच्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सादर करता येणार आहेत. विषय समित्यांपैकी प्रत्येक विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या ठरविणे, पालिकेचे उपाध्यक्ष ज्या विषय समितीचे पदसिद्ध सभापती असतील ती विषय समिती ठरविणे, विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करणे, विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवड करणे, समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करणे या प्रकारचे कामकाज या विशेष सभेत होणार आहे.