11 लाखांच्या निधीची चार लाखात बोळवण
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: September 18, 2017 10:48 AM2017-09-18T10:48:14+5:302017-09-18T10:55:28+5:30
अस्वच्छ क्षेत्रातील कामगार पाल्यांची व्यथा : संपूर्ण पैसा खर्च होऊनही निधीची कमतरता
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कातडी कामगारांच्या पाल्यांसाठी 11 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असतानादेखील प्रत्येक्षात 3 लाख 70 हजारांचा निधी देऊन बोळवण करण्यात आली आह़े त्यामुळे मागील वर्षी संबंधित लाभाथ्र्याना पूर्ण निधीचे वाटप करण्यात आल्यावरही यंदा निधीची कमतरता असल्याने लाभाथ्र्यासमोर समस्या निर्माण होत आह़े
जिल्ह्यात कातडी कामगार म्हणजेच अस्वच्छ कामगारांच्या लाभार्थी पाल्यांची संख्या 552 इतकी आह़े त्यासाठी साधारणत 10 ते 11 लाखांच्या निधीची आवश्यकता आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे 11 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती़ परंतु प्रत्यक्षात 3 लाख 70 हजार रुपयांचाच निधी समाज कल्याण विभागाला अद्यापर्पयत प्राप्त झाला आह़े त्यामुळे उर्वरीत लाभाथ्र्याचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आह़े मिळालेल्या 3 लाख 70 हजार रुपयांचा निधी समाज कल्याण विभागाकडून 199 लाभाथ्र्याचा वाटप करण्यात आला आह़े
प्रती लाभार्थी विद्यार्थी 1 हजार 850 प्रमाणे या निधीचे वाटप करण्यात येत असत़े त्यामुळे आतार्पयत 199 लाभाथ्र्याना 3 लाख 68 हजार 150 रुपये निधीचे वाटप करण्यात आले आह़े त्यामुळे उर्वरीत 353 विद्याथ्र्याचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े मागील वर्षी कातडी कामगारांच्या पाल्यांना समाजकल्याण विभागाकडून 8 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला होता़ त्यापैकी सर्वचा सर्व निधी हा लाभाथ्र्याना वाटप करण्यात आला होता़ परंतु यंदा लाभार्थी संख्या वाढली त्यामुळे साहजिकच निधीची मागणीही वाढली आह़े परंतु निधीची कमतरता जाणवत असल्याने यंदा लाभार्थी विद्याथ्र्याची परवड होणार असल्याचे दिसून येत आह़े
जिल्ह्यात मोठय़ा संख्येने अस्वच्छ कामगार, कातडी कामगार आहेत़ मुळात हा व्यवसाय करणारे लोक दारिद्रय रेषेखालील असल्याने शासनाकडून त्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असतात़ त्यासोबतच त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी केंद्रशासनाकडून नाशिक येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयामार्फत लाभाथ्र्याना दरवर्षी निधीचे वाटप करण्यात येत असत़े निवड झालेल्या अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांना प्रत्येकी 1 हजार 850 इतक्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े यातून त्यांचा शिक्षणाचा खर्च निघावा हा उद्देश शासनाचा असतो़ परंतु केंद्राकडूनच निधीची कमतरता भासत असल्याने येथील लाभार्थी विद्याथ्र्याना निधीपासून वंचित रहावे लागत आह़े
दरम्यान, नाशिक येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातून तीन ते चार टप्प्यांमध्ये हा निधी देण्यात येत असतो़ 3 लाख 70 हजार रुपयांचा निधीदेखील 2016-2017 या वर्षासाठी 3 टप्प्यात आला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल़े
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून तत्परतेने लाभाथ्र्याना निधीचे वाटप करण्यात येत असले तरी यात अनेक अडचणी येत असतात़ सर्वप्रथम पुरेस निधी मिळण्यास विलंब होत असतो़ त्यातच संपूर्ण योजना ही ऑनलाईन पध्दतीने चालते त्यामुळे काही वेळा लाभाथ्र्याचे ऑनलाईन अर्ज भरतानाही ‘सव्र्हर’ ची समस्या जाणवत असत़े त्यामुळे येथील कर्मचा:यांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत असतात़