दरड हटवण्याच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:59 PM2019-08-12T12:59:46+5:302019-08-12T12:59:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरूस्तीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर नागरिकांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत़ जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त करुन वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े
गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसानंतर धडगाव, नवापूर, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूकदेखील प्रभावीत झाली होती. पाऊस थांबताच प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. धडगाव तालुक्यातील कोयलीविहीर येथील रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. कात्री-खडक्या, बिलगाव आणि जर्ली-चुलवड रस्त्याचे दुरूस्तीचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. जर्ली पूलाची दुरूस्तीदेखील करण्यात येत आहे. तळोदा-धडगाव रस्त्यावर चांदसैली घाटात मोठय़ा प्रमाणात दरडी आणि वृक्ष कोसळले होते. ते बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावरून दरडी बाजूला करून एक बाजू वाहतूकीसाठी मोकळी करण्यात आली आहे. यामुळे तोरणमाळकडे एका बाजूने वाहतूक सुरु करण्यात आली आह़े
प्रशासनाकडून वाकी नदीवरील पुलाची दुरुस्ती सुरु करण्यात आली आह़े 7 रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नवापुर तालुक्यात भेट देऊन राज्य महामार्ग दुरूस्तीच्या सुचना दिल्या होत्या. दोन राज्यांना जोडणा:या या रस्त्याची आठवडारभरात दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आह़े महामार्गावर वाहतूकीसाठी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आह़े