वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘सिव्हील’च्या हस्तांतरणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:58 AM2019-07-08T11:58:38+5:302019-07-08T11:58:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केली ...

The speed of transfer of civilian for medical college | वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘सिव्हील’च्या हस्तांतरणाला वेग

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ‘सिव्हील’च्या हस्तांतरणाला वेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती़ या घोषणेनंतर दोन वर्षात संथावलेल्या कामकाजाला वेग आला असून नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण कामकाजास गती मिळाली आह़े येत्या महिन्यात रुग्णालय हस्तांतरीत होणार आह़े    
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होऊन दुर्गम भागार्पयत सवरेपचार देण्यात यावा, या हेतूने जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्मिती व्हावी अशी मागणी होती़ दोन वर्षापूर्वी झालेल्या महाआरोग्य शिबिरानंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती़ जून 2017 मध्ये झालेल्या या घोषणेनुसार जळगाव, बारामती आणि नंदुरबार या तीन वैद्यकीय महाविद्यालयांची पहिली बॅच 2018-19 पासून सुरु करण्याचे निश्चित होत़े परंतू सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालयांचे हस्तांतरण रखडल्याने या प्रक्रियेला ब्रेक लागला़  आता या प्रक्रियेला गती मिळाली असून रुग्णालयांची कागदोपत्री माहिती गोळा करण्यात येऊन विविध रुग्णालय आवारातील विभागवार  सांख्यिकी माहिती तयार करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवली जात आह़े 
गत आठवडय़ात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे प्रमुख यांनी नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयासाठी 50 प्रशासकीय कर्मचारी तर 150 वैद्यकीय शिक्षण देणा:या तज्ञ प्राध्यापकांच्या नियुक्त्यांबाबत प्रक्रिया सुरु केली होती़ यानुसार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या झाल्याचे सांगण्यात आले आह़े
 वैद्यकीय शिक्षण विभागाकडून रुग्णालय हस्तांतरण प्रक्रिया सुरु होत असताना जिल्हा रुग्णालयातील अधिका:यांच्या बदल्यांचीही चर्चा सध्या रंगू लागली आह़े आरोग्य विभागात बदल्यांचा मोसम नसला तरी वर्ग 1 आणि वर्ग 2 संवर्गातील वैद्यकीय अधिक्षक व प्रमुखांच्या बदल्या होणार असल्याचे मानले जात आह़े विशेष म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ भोये यांनाही पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जात आह़े लवकरच याबाबत अधिकृत आदेश काढले जाणार असल्याची माहिती आह़े 

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चालवण्यात येणा:या नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा आवाका आह़े विविध विभागांसह पोषण पुनवर्सन केंद्रासह, महिला रुग्णालयाचाही यात समावेश आह़े वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तीन वर्षाच्या करारावर ही सर्व यंत्रणा ताब्यात घेतली जाऊन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी व प्राध्यापक वृंद कामकाज सुरु करणार आहेत़ वैद्यकीय महाविद्यालासाठी टोकरतलाव रस्त्यावर 25 एकर जागेची निश्चिती यापूर्वी झाली आह़े या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी होण्यास पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आह़े बांधकाम पूर्ण होईर्पयत महाविद्यालय येथे सुरु राहील़ 

दरम्यान नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून डॉ़ गिरीष ठाकूर यांची नियुक्ती केली गेल्याची माहिती आह़े त्यांनी अद्याप पदभार स्विकारलेला नसला तरी त्यांच्या नावावर वैद्यकीय शिक्षण विभागाने शिक्कामोर्तब केले आह़े सोबत आणखी दोघा तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केल्याची माहिती आह़े 
 

Web Title: The speed of transfer of civilian for medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.