नंदुरबारात पिकांवर फवारणी करतांना विषबाधेने शेतमजुराचा मत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:48 PM2018-09-25T12:48:08+5:302018-09-25T12:48:24+5:30
नंदुरबार : पिकांवर फवारणी करतांना विषबाधा झाल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना खोक्राळे, ता.नंदुरबार येथे 21 रोजी घडली. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दासू महादू ठाकरे (50) रा.खोक्राळे, ता.नंदुरबार असे मयत शेतमजुराचे नाव आहे. ठाकरे हे शेतात किटकनाशकांची फवारणी करीत होते. त्यावेळी नकळत त्यांच्या नाका, तोंडात किटकनाशकांचे अंश गेले. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली. तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथे उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार अहिरे करीत आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ात देखील याच कारणामुळे शेतमजुराचा मृत्यू झाला होता.
याबाबत जनजागृती करून मजुरांना फवारणीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले गेले तर अशा घटना टळणार असल्याचे बोलले जात आहे.