दुर्गा दौडला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:09 PM2018-10-15T12:09:34+5:302018-10-15T12:09:39+5:30
तळोदा येथे उत्साह : युवक-युवतींचा मोठय़ा संख्येने सहभाग, चैतन्याचे वातावरण
तळोदा : नवरात्रोत्सवानिमित्त तळोदा शहरात प्रथमच दुर्गा दौड कार्यक्रम घेण्यात आला़ यासाठी पहाटे मोठय़ा संख्येने भाविक सहभागी होऊन मातेचे दर्शन घेत आहेत़ मातेचा जय जयकाराने सध्या शहरातील धार्मिक वातावरण ढवळून निघाले आह़े
तळोदा शहरात नवरात्रोत्सवाची मोठी धामधूम सुरु आह़े जिकडे तिकडे रास, गरबा, दांडीया रंगताना दिसून येत आहेत़ शहरातील विविध मातांच्या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आह़े यंदा प्रथमच श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर शहरात दुर्गा दौड हा धार्मिक कार्यक्रम राबवला जात आह़े
या कार्यक्रमास शहरातील सर्वभागातील मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आह़े या दौडमध्ये मातेच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविक सहभागी होत आहेत़ पहिल्या माळेपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली आह़े पहिल्या दिवशी सोनारवाडा, मेनरोड येथून दौड सुरु झाली़
पहाटे साडेपाच वाजेला दुर्गा दौडला सुरुवात केली गेली़ ज्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आह़े तेथून सुरुवात करुन संपूर्ण गावातून हातात भगवे ङोंडे, मशाल घेऊन मातेच्या जय जयकाराने भाविक दौड लावत असतात़ ठिकठिकाणी या दौडचे स्वागतही सुवासिनी करीत आहेत़ विशेषत: तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने या दौडमध्ये सहभागी होत आहेत़ दररोज एक-एक मंडळाकडून या दौडीचे आयोजन केले जात असत़े शनिवारी शहरातील माळी समाज मंडळाच्या देवीच्या स्थापनेच्या ठिकाणापासून दुर्गा दौडला सुरुवात करण्यात आली होती़
संपूर्ण शहरात दौड संपल्यानंतर पुन्हा मूर्ती स्थानेच्या ठिकाणीच दौडचा समारोप करण्यात आला होता़ ज्या ठिकाणी मातेचे मंदिर आहे तेथे सर्व भाविक मातेचे दर्शन घेत असतात़ दुर्गामाता दौडमुळे शहरातील धार्मिक वातावरण एका वेगळया उंचीवर गेले आह़े या कार्यक्रमात पालिकेच्या महिला व आरोग्य सभापती अंबिका शेंडे, नगरसेवक हेमलाल मगरे, शिरीष माळी, प्रदीप शेंडे, जगदीश परदेशी, नगरसेविका प्रतीभा ठाकूर, मुकेश बिरारे, गणेश चौधरी, शिवम सोनार, कार्तिक शिंदे, निखील सोनार, स्वप्नील चौधरी, विजय सोनवणे, निखील आघाडे, आकाश भोई, सचिन भोई, क्रिष्णा सोनार आदींसह शेकडो भाविक उपस्थित होत़े
दुर्गादौडसाठी शिवप्रतिष्ठानचे युवराज चौधरी, किरण ठाकरे, पराग राणे यानी परिश्रम घेतल़े