क्रीडा विभागाचा जिल्हा युवा महोत्सव स्पर्धकांअभावी पुन्हा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:37 PM2018-12-05T12:37:17+5:302018-12-05T12:37:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा विभागाने घोषित केलेल्या जिल्हा युवा महोत्सवाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा क्रीडा विभागाने घोषित केलेल्या जिल्हा युवा महोत्सवाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आह़े मंगळवारी स्पर्धकच न आल्याने क्रीडा विभागाने ही स्पर्धा 7 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आह़े
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने 29 नोव्हेंबर रोजी युवा महोत्सव घेण्याचे जाहिर केले होत़े या महोत्सवासाठी शहरातील डी़आऱ हायस्कूलला स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होत़े स्पर्धेसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर स्पर्धकांचे अर्ज येणे अपेक्षित होत़े परंतू मुदतीत अजर्च न आल्याने विभागाने ही स्पर्धा 4 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहिर केले होत़े परंतू मंगळवारीही स्पर्धक न आल्याने पुन्हा 7 डिसेंबर रोजी ही स्पर्धा घेण्याचे क्रीडा विभागाने कळवले आह़े
दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी स्पर्धेपूर्वी सर्व शाळा, महाविद्यालये, कलावंत यांना संपर्क करुन माहिती दिली होती़ महाविद्यालयांनी संघ पाठवण्याचे आश्वासन दिले होत़े परंतू ऐनवेळी एकाही संघाने नोंदणी केलेली नसल्याने ही स्पर्धा 7 रोजी होणार असल्याचे सांगितल़े
क्रीडा विभागाकडून लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, सितार, तबला, वीणा, मृदंग, बासरी, हार्मोनियम, गिटार वादन तसेच मणिपुरी नृत्य, ओडिसी नृत्य, भरतनाटय़म, कथ्थक, कुचीपुडी नृत्य आणि वक्तृत्व या 18 कला प्रकारात स्पर्धकांना नोंदणी करण्याचे कळवण्यात आले होत़े
क्रीडा विभागाकडून स्पर्धेत स्पर्धक न आल्याचे कारण देण्यात आले असले तरी या महोत्सवाची जिल्ह्यात योग्य त्या पद्धतीने प्रसिद्धी करण्यात आलेली नसल्याचे कलावंतांचे म्हणणे आह़े धडगाव, आणि अक्कलकुवा तालुक्यातील विद्याथ्र्याच्या कलापथकांना याबाबत माहिती नसल्याने स्पर्धा रखडल्याचे सांगण्यात आले आह़े उर्वरित कला प्रकारांबाबतही विभागाने प्रचार प्रसिद्धी केलेले नसल्याचे सांगण्यात आले आह़े
येत्या 7 डिसेंबर रोजी ही स्पर्धा न झाल्यास नाशिक विभागीय युवा महोत्सवात नंदुरबार जिल्ह्याची गैरहजेरी लागणार असल्याने कलावंतांनी चिंता व्यक्त केली आह़े