कोरोना रुग्ण आढळलेल्या क्षेत्रात सातवेळा फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 08:24 PM2020-04-25T20:24:43+5:302020-04-25T20:25:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाने बाहुबली मशिनच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने व त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाने बाहुबली मशिनच्या सहाय्याने बाधित क्षेत्रात सातवेळा औषधाची फवारणी केली. दरम्यान, औषध फवारणी करण्यासाठी पालिकेला शहरातील ट्रॅक्टर व्यापारी व शेतकऱ्यांनीही लहान ट्रॅक्टर उपलब्ध करून देत सहकार्य केले.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शहादा तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण होते. दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनमध्येही तालुका कोरोनामुक्त रहावा म्हणून नागरिक व प्रशासन दक्ष होते. त्यामुळे शहादा तालुका ग्रीन झोनमध्ये मोडत असल्याने २१ एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट मिळेल, अशी शहादेकर अपेक्षा ठेवून होते. परंतु तत्पूर्वीच शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने शहरात लॉकडाऊन शिथील होण्याऐवजी अधिक कडक करण्याचा निर्णय प्रशासनास घ्यावा लागला. या काळात कोरोनाचा संसर्ग शहरात वाढू नये म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने बाधित परिसर सॅनिटायझेशन करण्यास सुरवात केली. याकामी शहरातील ट्रॅक्टर व्यापारी व शेतकऱ्यांनी पालिकेस ट्रॅक्टर व औषध फवारणीचे महाबली मशिन देऊन सहकार्याचा हात पुढे केला. पालिकेने कोरोना रुग्ण सापडलेल्या परिसरात महाबलीच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल सातवेळा फवारणी केली असून आता शहरातील प्रत्येक प्रभागात फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख आर.एम. चव्हाण यांनी दिली.