वाळू तस्करी रोखण्यासाठी पथके स्थापन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:47 AM2019-12-10T11:47:09+5:302019-12-10T11:47:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महसूल, जैव विविधता समिती व वृक्ष लागवड व संवर्धन समितीची बैठक घेवून आढावा घेतला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे, गाºहाणे निराकरण प्राधिकरणाचे सचिव संदीप कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, कार्यकारी अभियंता अनिल पवार, अमरदिप पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, अनिल थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. बोडके, इंडियन मेडीकल असोशिएशनचे डॉ. राजेश वळवी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सौजन्या पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी राहूल वाघ जिल्ह्यातील सर्व तहसिलदार गट विकास अधिकारी व संबंधित यंत्रणेचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वाळू सनियंत्रण समिती बैठकीत वाळूघाटांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करुन वाळू घाटांचे प्रस्ताव तात्काळ तहसिलदारांनी सादर करावे असे निर्देश दिले. तसेच तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू घाटांना नियमितपणे भेटी देवून तपासणी करावी. तसेच वाळूच्या अवैद्य वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर तात्काळ पथक कार्यान्वीत करावेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामांचा आढावा घेतांना प्रलंबित असलेली कामे लवकर पूर्ण करावेत. खाजगी क्षेत्रावर, शेताच्या बांधावर वृक्ष लागवडीचा उपक्रम शेतकºयांना आर्थिक लाभ देणारा असल्याने त्यांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच प्रत्येक विभागास सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्या असे सांगितले. महसूल विभागातील पुरवठा, गौणखजिन, टंचाई, निवडणूक, कुळवहिवाट, भुसंपादन, संजय गांधी योजना या विभागांचा आढावा घेण्यात आला.
जैविक विविधता व्यवस्थापन संदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील समित्यांनी जैविक विविधता संदर्भात नोंदवह्यांमध्ये नोंदी घ्याव्यात व जैविक विविधतेचे काम मुदतीत पुर्ण करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत दर वर्षी लागवड केलेल्या वृक्षांचे चांगल्याप्रकारे संगोपन करुन जिल्ह्यात शंभर टक्के वृक्ष जगलेले दिसतील असे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.