नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:32 PM2020-01-04T12:32:47+5:302020-01-04T12:32:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयातर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० राबवण्यात येत आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयातर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० राबवण्यात येत आहे़ यांतर्गत विविध कार्यक्रम सुरु असून कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़ बुधवारी झालेल्या बैठकीत कर्मचाºयांना तंज्ञांनी प्रशिक्षण दिले़
पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या कार्यशाळेत मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड, मुख्य लेखापाल बळवंत गायकवाड, मुख्य नगर अभियंता चंद्रकांत खर्चे, नगर अभियंता श्यामकुमार करंजे, पाणी पुरवठा अभियंता विशाल कामडी, प्रभारी आरोग्य अधिकारी राजेश परदेशी, शहर समन्वयक सायली बाविस्कर यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेत कंपोस्ट खत निर्मिती बाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले़
सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरातील विविध भागात सध्या उपक्रम सुरु आहेत़ यात कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाबाबत कामकाज होणार आहे़ यांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीकडून कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले़ यात निर्मिती प्रक्रिया, बाह्य वापर आणि अंतर्गत अडचणी यावर चर्चा करण्यात आली़ एजन्सी तज्ञांकडून यावेळी कर्मचाºयांसोबत संवाद साधला़