प्रकाशा येथे भजन स्पर्धा सप्ताहाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:09+5:302021-01-13T05:22:09+5:30

प्रकाशा येथील गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणात मंगळवारपासून भजन स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सरपंच सुदाम ठाकरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, ...

Start of Bhajan Competition Week at Prakasha | प्रकाशा येथे भजन स्पर्धा सप्ताहाचा प्रारंभ

प्रकाशा येथे भजन स्पर्धा सप्ताहाचा प्रारंभ

Next

प्रकाशा येथील गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणात मंगळवारपासून भजन स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सरपंच सुदाम ठाकरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पं.स. सदस्य जंग्या रंग्या भिल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच भरत पाटील, ग्रामसेवक बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, रफीक खाटीक, किशोर चौधरी, नंदकिशोर पटेल, पंडित भोई, गजानन निकवाडे, गणेश सोनवणे, पंढरीनाथ पुनाजी पाटील आदी उपस्थित होते.

१२ ते १९ जानेवारीपर्यंत भजन स्पर्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज रात्री नऊ वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाचे नियम पाळत एकतारी भजन स्पर्धा रंगणार आहे. नंदुरबार, तळोदा, शहादा तालुक्यातील गावातील भजनी मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यात २१ भजनी मंडळांनी सहभाग नोंदविलेला आहे. मंगळवारी रात्री वैजाली, तळवे, वरूळ-कानडी, १३ जानेवारीला निंभोरा, ससदे, पिपळोद, १४ जानेवारी रोजी मोड, भालेर, पाडळदा, १५ रोजी नळवा, बोरद, नांदरखेडा, १६ जानेवारीला शेल्टी, चिखली, अवघे, १७ रोजी आमलाड, डोंगरगाव, पळाशी, १८ जानेवारीला सदगव्हाण, प्रकाशा, रामपूर, लाखापूर येथील भजनी मंडळांच्या मैफली रंगणार आहेत. सप्ताहाचा समारोप हा १९ जानेवारी रोजी गौतमेश्वर मंदिराच्या प्रांगणात महाप्रसाद वाटपाने होणार आहे. सहभागी सर्व भजनी मंडळांना जि.प.च्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

या सप्ताहाचे नियोजन पं.स. सदस्य जंग्या सोनवणे, शांतीलाल ठाकरे, राजेश पाडवी, किसन ठाकरे, अशोक माळीच, उद्धव पाडवी, इदास पवार, गजानन ठाकरे, ब्रिजलाल पाडवी, किशोर माळी, गौतम महाराज आदींनी केले आहे.

Web Title: Start of Bhajan Competition Week at Prakasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.